Malvan Sting Operation
esakal
मालवण (रत्नागिरी) : पालिका निवडणुकीत येथील भाजपच्या एका जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याच्या घरी काल आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी थेट धडक दिली. तेथे पिशवीत सापडलेले पैसे निवडणुकीत वाटण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडून आल्याचा आरोप त्यांनी केला. हे स्टिंग ऑपरेशन (Malvan Sting Operation) त्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह करत पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांना पाचारण केले. हा प्रकार काल रात्री उशिरा घडला.