मालवण : कृषी दुकानाला आग लागून अडीच लाखाचे साहित्य जळून खाक

शहरातील सोमवारपेठ येथील विलास एजन्सीज या दुकानाला आज पहाटे अचानक आग लागली.
साहित्य जळून खाक
साहित्य जळून खाकSAKAL

मालवण : शहरातील सोमवारपेठ येथील विलास एजन्सीज या दुकानाला आज पहाटे अचानक आग लागली. या आगीत कीटक नाशके, खते व इतर साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दिवाळी जवळ आल्याने बाजारपेठेत आपल्या दुकानाची साफसफाई करणाऱ्या युवा दुकानदारांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बाजारपेठेतील नागरिकांना आणि पालिकेला माहिती दिली. सुमारे दीड दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

शहरातील सोमवारपेठ येथील हनुमान मंदिर समोर विलास हरमलकर यांचे विलास एजन्सीजचे खत, कीटकनाशके विक्रीचे दुकान आहे. काल रात्री श्री. हरमलकर हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले होते. आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास विलास एजन्सीज या दुकानाला आग लागली. दुकानातून येणाऱ्या मोठ मोठ्या ज्वालानी आकाश व्यापून जात असल्याचे चित्र विलास एजन्सीज पासून जवळच असलेल्या सोमवारपेठ येथील गुरुमाऊली या कपड्याच्या दुकानात साफसफाई करणाऱ्या राजेश मुंबरकर तसेच शुभम अंधारी आणि त्याच्या इतर मित्र मंडळींना दिसताच त्यांनी धावाधाव करत पालिकेला तसेच नागरिकांना आणि दुकानाचे मालक विलास हरमलकर यांना आगीची माहिती दिली. यावेळी नागरिकांनी विहिरीला पंप लावून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला.

साहित्य जळून खाक
ऑनलाईन शॉपिंग करा, संसर्ग टाळा; सरकारने दिल्या सूचना

यावेळी पालिकेचे मुकादम श्री. वळंजू यांनी पालिकेतून फायर बॉल आणून आगीच्या ठिकाणी मारा सुरू केला. यावेळी राजेश मुंबरकर, शुभम अंधारी, अमेय देसाई, स्वप्नील अंधारी व इतर तरुणांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी अमेय देसाई, फारुख ताजर, दुकान मालक विलास हरमलकर, विनायक सापळे, रणजित पारकर, रमेश पारकर , रंजन मुंबरकर, दिनेश मुंबरकर, समीर कदम, भूषण मुंबरकर, शेखर अंधारी, दुर्गेश परब, आदित्य देसाई, आकाश खोत, हरेश मुंबरकर, सरदार ताजर, मुकादम आनंद वळंजू, कोकरे यांच्यासह व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, नितीन तायशेटे व इतर नागरिकांनी यांनी अथक परिश्रम घेतले.

हरमलकर यांच्या दुकानाला आग लागल्याचे समजताच पालिकेचे मुकादम श्री. वळंजू आणि त्यांचा मुलगा विरेश वळंजू यानी धावाधाव करत पालिकेतून फायर बॉल आणून ते भडकलेल्या आगीवर फेकले. आग विझविण्यासाठी आठ फायर बॉलचा वापर करण्यात आला. त्यामुळे बऱ्याच अंशी आग आटोक्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com