ब्रेकिंग -आरवली टाक समुद्रात एकजण बुडाला; रशियन महिला सुखरूप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

आरवली टाक समुद्रकिनाऱ्यावर दाभोली येथील केतन मोहन सातार्डेकर (वय 25) हा समुद्राच्या पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत गेलेली रशियन महिला पर्यटक मात्र सुखरूप किनाऱ्यावर आली. ही घटना आज घडली. याबाबत येथील पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. 

वेंगुर्ले - आरवली टाक समुद्रकिनाऱ्यावर दाभोली येथील केतन मोहन सातार्डेकर (वय 25) हा समुद्राच्या पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत गेलेली रशियन महिला पर्यटक मात्र सुखरूप किनाऱ्यावर आली. ही घटना आज घडली. याबाबत येथील पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. 

हे पण वाचा - व्हिडिओ : भाच्याने घेतला स्टार, मामाने उडवला हवेत बार.... 

दाभोली येथील केतन मोहन सातार्डेकर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून त्याने गोवा येथे नोकरी केली होती. त्याच्या उत्कृष्ठ कामामुळे नोकरीसाठी त्याला कुवेतमध्ये संधी मिळाली. आज तो दाभोली येथे आला होता. तो 14 ला कुवेतला जाणार होता. आज सकाळी 11.30 च्या सुमारास केतन आपल्या समवेत रशियन पर्यटकाला घेऊन टाक समुद्र किनारा दाखविण्यासाठी तेथे असलेले नातेवाईक रूपेश तांडेल याच्याकडे आला होता. जेवण होईपर्यंत आम्ही आंघोळ करून येतो असे सांगून तो त्या विदेशी पर्यटकांसमवेत किनाऱ्यावर गेला. तर त्याचे नातेवाईक बाजारात गेले. दुपारी एकच्या सुमारास किनाऱ्यावर स्थानिकांनी गर्दी केली.

हे पण वाचा - ढाई अक्षर अन्‌ एक ऑर्डर 

समुद्रात आंघोळ करताना केतन पाण्यात बुडताना पाहून त्या रशियन महिला पर्यटकाने आरडाओरड केली; मात्र ती भाषा त्यांना समजली नाही. त्या किनाऱ्यावरील पर्यटकांना सेवा देणाऱ्या एका व्यक्तीने इंग्रजी भाषेतून तिला विचारले तेव्हा सर्वांना समजले किकेतन आंघोळ करताना बुडाला. त्यानंतर लगेचच स्थानिकांनी आपल्या परीने बुडालेल्या केतनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. लगेच या घटनेसंदर्भात वेंगुर्ले पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी वेंगुर्ले बंदरातील गस्तीनौका त्या तरूणाचा शोध घेण्यासाठी पाठविली. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांचे सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे, उपनिरीक्षक विनायक केसरकर, सहायक उपनिरीक्षक वासुदेव परब, सामाजिक कार्यकर्ते मयुर शिरोडकर आदी तत्काळ घटनास्थाळी रवान झाले. गस्तीनौकेने उशीरापर्यत त्या तरूणाच समुद्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण उशिरापर्यत तो सापडला नव्हता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A man drowns in a sea of ​​sewage tank