मोहर घेवून कोकणात थंडी दाखल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mango and cashew Stamped in ratnagiri kokan marathi news

फेब्रुवारी महिना सुरू झाला असून मध्यंतरी पडलेल्या कडाक्‍याच्या थंडीने परिसरातील आंबा, काजू कलमे मोहोराने लगडली आहेत.

मोहर घेवून कोकणात थंडी दाखल..

मंडणगड (रत्नागिरी) :  गायब झालेली थंडी चार दिवसांपासून पुन्हा सुरू झाल्याने मंडणगड तालुक्‍यातील आंबा,काजूला मोहोर दिसू लागला आहे.मोहरलेली झाडे पाहून तालुक्‍यातील शेतकरी आनंदला असून होणारी फळधारणा पाहून आशावादी झाला आहे. पहाटे गारठायुक्त थंडी जाणवत असून जंगलातील अन्य फळझाडेही मोहरू लागली आहेत. 

फेब्रुवारी महिना सुरू झाला असून मध्यंतरी पडलेल्या कडाक्‍याच्या थंडीने परिसरातील आंबा, काजू कलमे मोहोराने लगडली आहेत. गेल्यावर्षी अवकाळी पावसाने सर्वांचाच हिरमोड केला. दरवर्षी सप्टेंबरपर्यंत पडणारा पाऊस यावर्षी लांबला. त्यामुळे थंडीचा मोसम लांबला आणि बदललेल्या वातावरणामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेस उशीर झाला. तालुक्‍यातील खाडीभाग वगळता अन्य भागांत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहोराला सुरवात झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कडाक्‍याची थंडी होती. मात्र, मध्येच आलेल्या ढगाळ वातावरणाने मोहोराचा घात होण्याची शक्‍यता होती.

हेही वाचा- धक्कादायक ! `येथे` सीलबंद बाटलीऐवजी नळाच्या पाण्याची विक्री

आंबा कलमे मोहरली

मात्र, पुन्हा ढगाळ वातावरण गायब झाले आणि थंडीचा कडाका वाढल्याने बहुतांश भागांतील आंबा-काजू कलमे मोहोरताना दिसत आहेत. घुमरी, निगडी, वेळास, उमरोली, जावळे, आंबवणे बुद्रुक, या खाडीभागातील खाऱ्या हवामानामुळे या परिसरात आंबा कलमे मोहरली असून त्याचे रुपांतर छोट्या कैऱ्यांमध्ये होत आहे. लांबलेल्या प्रक्रियेमुळे आंबा पिकण्यालाही उशीर होणार असून तालुक्‍यातील आंब्याचा हंगाम एप्रिल-मे महिन्यात जाण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणूका लढविण्यासाठी `येथे` काँग्रेसची तयारी

आंबा काजू उत्पादन लांबणार

पाऊस लांबल्याने मोहोर प्रक्रिया उशिराने सुरू झाली. त्यामुळे आंबा काजू उत्पादन लांबणार आहे. फेब्रुवारीमध्ये बाजारात विक्रीला येणारी कैरी अजूनही आली नाही. प्रत्येकवेळी बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्याला बसतो आहे.
- समीर पारधी