
-अमित गवळे
पाली : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी (ता. 29) मुंबईत आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने आले आहेत. मात्र एक अवलिया परभणीवरून थेट सायकलने निघाला असून गुरुवारी (ता. 28) मध्यरात्री त्यांनी 720 किलोमीटरचे अंतर पार करत मुंबई गाठली. आणि शुक्रवारी (ता. 29) मुंबईत आंदोलनात ते सामील झाले.