esakal | कोरोनासोबत लढ्यासाठी हर्णेत 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी'

बोलून बातमी शोधा

कोरोनासोबत लढ्यासाठी हर्णेत 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी'
कोरोनासोबत लढ्यासाठी हर्णेत 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी'
sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णे : दापोली तालुक्यातील हर्णे ग्रामपंचायत (Gram panchayat) कार्यालयात 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी' (Mazi Ratnagiri, Mazi Jababdari) या अभियानाचा शुभारंभ दापोली पंचायत समिती माजी सभापती रऊफ हजवाने ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोव्हिड -19 (Covid-19) रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. हर्णे गावातही कोरोना रुग्ण वाढत आहेत. यापुढे कोरोना नियंत्रणात (Corona Control Policy) आणण्यासाठी जबाबदारी जनतेच्या सहभागाची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी' मोहिम राबवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा (Collector Laxmi Narayan Mishra) यांनी घेतला आहे .

या मोहिमेबाबत हर्णे ग्रामपंचायत सरपंच श्रीम. ऐश्वर्या धाडवे म्हणाल्या, ही महामारी संपूर्ण जगावर आलेले एक भयानक संकट आहे. या महामारीवर मात करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. त्यासाठी सर्वांनी गर्दी करणे टाळायला हवे. बाहेरून घरी आल्यावर सॅनिटायझरने (sanitizer) हात स्वच्छ केले पाहिजेत. तसेच दर दोन तासांनी हात स्वच्छ धुतले पाहिजेत. तोंड व नाकावर मास्क कायम गरजेचे आहे. काळजी आपण घेतली तर कोरोनापासून मुक्त होऊ शकतो.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर विक्रीचं आता 'सेलर्स मार्केट' झालंय!

या अभियानासाठी आशासेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, हर्णे जि.प. मराठी (Zilha parishad School) शाळेच्या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गावातील पाच वॉर्डमध्ये (Ward) प्रत्येकी वॉर्डसाठी तीन ते चार लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक गटाकडे एक ऑक्सिमिटर (Oxymeter) व तापमान मीटर दिला आहे. सुरक्षेसाठी हातमौजे व सॅनिटायझर देण्यात आले असून त्याचा वापर कर्मचाऱ्यांनी करायचा आहे असे धाडवे यांनी सांगितले.

सदर मोहिम १५ दिवसांच्या कालावधीत घेण्याचे निश्चीत करण्यात आले असून मोहिमेच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आलेल्या परिपत्रकाची माहिती ग्रामविस्तार अधिकारी कृष्णाद साळुंखे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून हर्णे दुरक्षेत्राचे पोलिस हेडकोन्स्टेबल मोहन कांबळे यांना पोलीस महासंचालक पदक मिळाल्याने शाब्दिक पद्धतीत अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी हर्णे ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील , ग्रा.प. कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा: तिसऱ्या फेरीत विरोधी गटाचे 12 उमेदवार आघाडीवर