

माध्यान्ह पोषण आहाराचा तांदूळ चोरून नेत होते, ग्रामस्थांनी ट्रक अडवला अन्; मुख्याध्यापकचं निघाला चोरटा
esakal
Headmaster Red Handed Caught : राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिर येथे पोषण आहाराचा तांदूळ ट्रकमधून चोरून नेताना ग्रामस्थांनी तो ट्रक पकडला. नाटे पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक, सहायक शिक्षक आणि दोन ग्रामस्थ अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काल (ता. ५) मध्यरात्री घडला असून, शाळेच्या गोदामातून पोषण आहाराच्या धान्याची पोती चोरून नेण्याचा प्रयत्न फसला.