नितेश राणे यांचा आमदारकीचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कणकवली - नितेश राणे यांनी आज काँग्रेस आमदार पदाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे खासगी सचिव राजकुमार सागर यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे.

कणकवली - नितेश राणे यांनी आज काँग्रेस आमदार पदाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे खासगी सचिव राजकुमार सागर यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे.

दरम्यान नितेश राणे उद्या भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यासाठी त्यांनी काँग्रेसच्या आमदाराकीचा राजीनामा देणे अपेक्षीत होते. त्यानुसार त्यांनी आज हा राजीनामा दिला. श्री. बागडे यांनी राणे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राणे यांनी  काँग्रेसच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा पक्ष कार्यालयात पाठवला आहे. 

राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमानचे उद्या भाजपमध्ये विलीनीकरण 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitesh Rane resignation