'या' आमदाराची एकाच पक्षाकडून विजयाची हॅट्‌ट्रीक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 November 2019

राजापूर मतदारसंघात ल. र. हातणकर हे पाच वेळा आमदार झाले. गणपत कदम हे तीन वेळा आमदार झाले. पण एकाच पक्षातून सलग तीन वेळा आमदार त्यांना होता आले नाही. 

राजापूर - कुणबी फॅक्‍टरसह स्थानिकत्वाचा मुद्दा आदींमुळे चर्चेत आलेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंतचा इतिहास शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी मोडीत काढताना नव्या इतिहासाची नोंद केली आहे. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकाच पक्षाकडून विजयाची हॅट्‌ट्रीक करणारे राजापूर विधानसभा मतदारसंघातील राजन साळवी पहिले आमदार ठरले आहेत. 

राजापूर मतदारसंघात ल. र. हातणकर हे पाच वेळा आमदार झाले. गणपत कदम हे तीन वेळा आमदार झाले. पण एकाच पक्षातून सलग तीन वेळा आमदार त्यांना होता आले नाही. 

कोकणी शेतकरी आदित्यनां म्हणाला, आत्महत्येशिवाय पर्याय नायं 

सलग तिसऱ्यांदा एकाच व्यक्तीला एकाच पक्षाकडून आमदार म्हणून सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राजापूरकरांनी संधी दिलेली नाही. मात्र, चौदाव्या विधानसभा निवडणुकीत साळवी यांनी 11 हजार 876 मतांनी विजय मिळविला अन्‌ इतिहास घडवला.

हातणकर पाचवेळा आमदार पण...

1962 पासून आजपर्यंत या मतदारसंघात झालेल्या निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री कै. ल. र. हातणकर सर्वाधिक म्हणजे तब्बल पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामध्ये, जनता दल आणि काँग्रेसतर्फे प्रत्येकी दोनवेळा तर, पीएसपी पक्षातर्फे एकवेळा निवडून आले आहेत.

चक्रीवादळाच्या तडाख्यात या पर्यटन केंद्राचे नुकसान 

गणपत कदम तीन वेळा आमदार पण...

त्यानंतर माजी आमदार गणपत कदम सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सलग दोनवेळा आणि एकदा पोटनिवडणुकीमध्ये असे तीनवेळा विविध पक्षांतर्फे आमदार म्हणून निवडून आले. मात्र, आजपर्यंत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकाच व्यक्तीने सलग तीनवेळा विजयी होवून हॅट्ट्रिक साधलेली नाही. त्यामुळे यावेळच्या निवडणूक निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. विजय मिळवून साळवी यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नव्या इतिहासाची नोंद केली आहे. 

वयाच्या चाैदाव्यावर्षी आकांक्षाने जिंकली राज्य मानांकन कॅरम स्पर्धा 

राजापूर मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आमदार -

  • ल. र. हातणकर - 1967, 1978, 1980, 1985, 1990
  • सहदेव मुकुंद ठाकरे - 1962, 1972 
  • गणपत कदम - 1999, 2004, 2006
  • राजन साळवी - 2009, 2014, 2019
  • विजयराव साळवी -1995
  • नारायण तावडे - 1980 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rajan Salavi Hat trick In Rajapur By One Party Shiv sena