रत्नागिरीत मतदारांच्या विश्‍वासाला सेनेमुळे तडा...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक महाराष्ट्र भाजपसाठी महत्त्वाची आहे.
 

रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक उपस्थित कार्यकर्त्यांसाठी जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच महाराष्ट्र भाजपसाठी महत्त्वाची आहे. महायुतीला बहुमत मिळूनही शिवसेनेच्या भूमिकेमुळे मतदारांच्या विश्‍वासाला तडा गेला. राज्‍यातील अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली. प्रकल्प बंद झाले. याचा जाब मतदारांनी २९ ला पोटनिवडणुकीसाठी मतदानातून विचारावा, असे प्रतिपादन आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.

हेही  वाचा - जनतेच्या आग्रहाखातर भाजपने यांना दिली उमेदवारी

रत्नागिरीत भाजपचा एकही उमेदवार  नाही 

विराट शक्तिप्रदर्शन करून भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरला. तत्पूर्वी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभेची निवडणूक शिवसेना-भाजप युती म्हणून लढलो. त्यात सर्वांत मोठी त्यागाची भूमिका रत्नागिरी जिल्ह्याने घेतली. येथे भाजपचा एकही उमेदवार नव्हता. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रत्येक मतदार, इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी होती. राज्यात दोन महिने नाट्य सुरू आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री न होणे, हे कोणालाही पटत नाही, असे ते म्हणाले.

 हेही वाचा - महाराष्ट्र, गोव्याच्या मत्स्योत्पादनात कशामुळे घट.... ?
प्रचारात नागरी सुविधा मुद्दे महत्वाचे 

ॲड. पटवर्धन म्हणाले,
‘‘विजयानंतर रत्नागिरकांना अभिप्रेत गतिमान व स्वच्छ प्रशासन, नागरी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. मुबलक, स्वच्छ पाणी, सुंदर रस्ते हेच प्रचाराचे मुद्दे आहेत.
निवडणूक लादली : पटवर्धन

 हेही वाचा - दुधात पडली ‘महागाई’ची माशी

सत्ताधीशांना जागा दाखवण्याची संधी

ॲड. पटवर्धन म्हणाले, ‘‘विरोधकांनी अवसानघात झाल्याप्रमाणे निवडून दिलेल्या नगराध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी राजकीय नाट्य केले. रत्नागिरीकरांवर निवडणूक लादली गेली. शहरात नागरी सुविधा योग्य प्रकारे मिळत नाहीत. या निवडणुकीत सत्ताधीशांना जागा दाखवण्याची संधी मिळाली आहे.

परिसर दणाणला

भारत माता की, वंदे मातरम्‌, पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो, देवेंद्र फडणवीस आगे बढो, दीपक पटवर्धन आगे बढो, येऊन येऊन येणार कोण भाजपशिवाय आहे कोण, अशा अशा घोषणांनी जयस्तंभ परिसर दणाणून गेला. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या पोटनिवडणुकीत विजय मिळवणारच, असा संकल्प या वेळी केला. मेळाव्यामध्ये प्रभाग १४ मधील सचिन गांधी व फौजिया वस्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ravindra Chavan Say Voters Beavers Changing beliveness From Shivsena In Ratnagiri