Raj Thackeray Guhagar Assembly Election
Raj Thackeray Guhagar Assembly Electionesakal

Raj Thackeray : ठरलं! गुहागरमधून मनसे निवडणूक लढवणार; गांधींना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी

सध्याच्या राजकीय घडामोडीला नागरिक कंटाळले असून मनसे हा एकमेव पर्याय नागरिकांसमोर आहे.
Summary

मनसेमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार गावागावात वाडीवस्त्यांवर जाऊन कार्यकर्त्यांनी सांगितले पाहिजे.

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) गुहागर तालुक्याच्या वतीने पक्षसंघटना वाढीसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक शृंगारतळी येथील (ता. गुहागर) संपर्क कार्यालयात झाली. या वेळी गुहागर विधानसभा निवडणूक (Guhagar Assembly Election) लढवण्यास आम्ही सज्ज आहोत. या मतदारसंघातून प्रमोद गांधी (Pramod Gandhi) यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

या सभेमध्ये संघटनावाढीसंदर्भात चर्चा करण्यात आली. गुहागर तालुक्यातील मतदार मनसेला मतदान करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या वेळी तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर म्हणाले, ‘गावागावांत, वाडीवस्त्यांवर मनसे पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. पुढील काळात मनसेला चांगले दिवस प्राप्त होतील. तालुक्यात चांगले वातावरण आहे. जनता नक्कीच मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

Raj Thackeray Guhagar Assembly Election
Mahadik Family Diwali : माहोल दिवाळीचा, पण चर्चा निवडणुकांची; महाडिकांच्या फराळाला कोण-कोण नेते उपस्थित?
MNS Will Contest Guhagar Assembly Election
MNS Will Contest Guhagar Assembly Electionesakal

उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी गुहागर मनसेमध्ये गटतट नसून आगामी निवडणुका एकदिलाने लढवण्यास आम्ही सज्ज आहोत असे सांगितले. ते म्हणाले, तालुक्यात अनेक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून मनसेचे उमेदवार निवडून आले आहेत.’ याप्रसंगी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष गांधी म्हणाले, ‘तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Raj Thackeray Guhagar Assembly Election
Uniform Civil Code : 'देशात हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर, समान नागरी कायदा लागू करा'; माजी आमदाराची मागणी

पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मनसेमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार गावागावात वाडीवस्त्यांवर जाऊन कार्यकर्त्यांनी सांगितले पाहिजे. सध्याच्या राजकीय घडामोडीला नागरिक कंटाळले असून मनसे हा एकमेव पर्याय नागरिकांसमोर आहे.

Raj Thackeray Guhagar Assembly Election
Shivsena Politics : कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! प्रवक्ते भोगटेंची शिवसेनेला सोडचिठ्ठी

या बैठकीसाठी प्रसमीर जोयशी, सुरेंद्र निकम, उप तालुकाध्यक्ष मंदार रहाटे, जितेंद्र साळवी, संदेश ठाकुर, विभाग अध्यक्ष स्वप्नील कांबळे, तुषार शिरकर, सुनिल मुकनाक, सुहास चोगले, सुशांत कोळंबेकर, वैभवी जानवळकर, वर्षा शितप, रजनी शितप, किरण आंबेकर, प्रसाद आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com