Sanjay Bhogte resigned from ShivSena Uddhav Thackeray Group
Sanjay Bhogte resigned from ShivSena Uddhav Thackeray Groupesakal

Shivsena Politics : कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! प्रवक्ते भोगटेंची शिवसेनेला सोडचिठ्ठी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) स्थापनेनंतर अगदी दहाव्या मिनिटांमध्ये मी त्या पक्षात प्रवेश केला होता.
Summary

मी कोणत्या पक्षात जाणार ते आत्ताच जाहीर करणार नसून राजकीय काम मात्र करतच राहणार आहे.

कुडाळ : शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) सोडत असल्याची घोषणा पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व तालुका प्रवक्ते संजय भोगटे (Sanjay Bhogte) यांनी पत्रकार परिषदेत केली. मी पक्ष स्वच्छेने सोडत नसून पक्ष सोडण्याची कारणे लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

येथील एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात माजी जिल्हा परिषद सदस्य भोगटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) स्थापनेनंतर अगदी दहाव्या मिनिटांमध्ये मी त्या पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर मी राष्ट्रवादीचे काम कुडाळ तालुका, शहरामध्ये सुरू केले. तालुक्यामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने काम केलं हे नवीन सांगण्याची गरज नाही. त्यावेळी पहिलीच निवडणूक सावंतवाडी अर्बन बँकेची लढवली.

Sanjay Bhogte resigned from ShivSena Uddhav Thackeray Group
Deepak Kesarkar : मंत्री केसरकर खरंच आमदारकी सोडून खासदारकी लढवणार? स्वत:च केला 'या' मतदारसंघावर दावा!

ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षात होती. त्यामध्ये माझा विजय झाला. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुक राष्ट्रवादी व शिवसेनेच्या माध्यमातून लढवली व विजयी झालो. चांगल्या प्रकारे काम केले. काम करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह राजकीय काम करत आलो. त्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नऊ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सध्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

Sanjay Bhogte resigned from ShivSena Uddhav Thackeray Group
Mahadik Family Diwali : माहोल दिवाळीचा, पण चर्चा निवडणुकांची; महाडिकांच्या फराळाला कोण-कोण नेते उपस्थित?

नऊ वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करत होतो. आता मात्र मी या पक्षाचा जिल्हा कार्यकारी सदस्य व तालुका प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन त्या संघटनेतून बाहेर पडत आहे. मी कोणत्या पक्षात जाणार ते आत्ताच जाहीर करणार नसून राजकीय काम मात्र करतच राहणार आहे.

Sanjay Bhogte resigned from ShivSena Uddhav Thackeray Group
Uniform Civil Code : 'देशात हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर, समान नागरी कायदा लागू करा'; माजी आमदाराची मागणी

जनतेच्या कामासाठी मंत्र्यांना भेटतो

मी लोकांच्या कामासाठी मंत्री दीपक केसरकर तसेच इतर मंत्र्यांना भेटतो. त्यावेळी मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती; पण येथील स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधी गटात असतानाही ते सर्व मंत्र्यांना भेटतात त्याचे काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com