रत्नागिरीत चार पोलिसांसह 18 जणांना कोरोनाची बाधा.....

राजेश शेळके
Tuesday, 11 August 2020

बाधितांचा आकडा नियंत्रणात येत नसल्याने आरोग्य विभाग आणि प्रशासन काळजीत आहे.

रत्नागिरी : तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आज सकाळी नव्याने 18 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

तालुक्यात  कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी रात्री 23 तर सोमवारी 29 आणि आज सकाळी 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात चार पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये शहर पोलिस ठाणे 1, एलसीबीतील 2 आणि पोलिस मुख्यालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यासह जयगड 2, आरोग्य मंदिर 1, भाट्ये 1, शिवाजी नगर 1, जोशी पाळंद 1, शेट्ये नगर 1, गोळप 2, निवळी फाटा 1, खेडशी फाटा 2, लाला कॉम्प्लेक्स 1, चर्मालय 1 येथे नवे रुग्ण सापडले आहेत. 
 

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बाधितांचा आकडा नियंत्रणात येत नसल्याने आरोग्य विभाग आणि प्रशासन काळजीत आहे. कोविड योद्धा डॉक्‍टर्स, नर्स, पोलिस यामध्ये बाधित होत आहेत. आतातर स्थानिक पातळीवर कोरोना पसरत चालला आहे. पोस्ट ऑफिस, पोलिस वसाहत, पोलिस कर्मचाऱ्यांची मुलं, व्यावसायिक बाधित होत आहेत. रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात ७७  नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी- २२, दापोली- ४, कळंबणी- १६, गुहागर- ३, कामथे- २, देवरूख- ३, रायपाटण- ५, अँटीजेन टेस्ट- २२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज वेगवेगळ्या कोविड सेंटरमधील २२, होम आयसोलेशनमधील ५२ आणि ५ परजिल्ह्यात उपचारासाठी गेलेले असे ७९ जण बरे झाले.

हेही वाचा- बाप्पाच्या उत्सवासाठी चाकरमान्यांना असे करावे लागणार सुट्ट्यांचे नियोजन -

त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या १५६८ झाली आहे. जिल्ह्यातील दोघांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये खेडशी (ता. रत्नागिरी) येथील एका ५५ वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल ॲन्टीजने टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच वांद्री (ता. संगमेश्वर) येथील ५७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे एकूण मृतांची संख्या ८० झाली आहे.

हेही वाचा- रत्नागिरीत वाळू माफियांकडून  वादळग्रस्तांची लूट -

ॲक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ६४२ आहेत. जिल्ह्यात सध्या २४३ ॲक्‍टिव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक विलगीकरणात कक्षात एकूण १५१ संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत. आजअखेर होम क्वारंटाईन खाली ४७  हजार ५५० जण आहे. परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात २ लाख ६३ हजार ५६७ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.   

हेही वाचा- आता फक्त चिंगळांचाच आधार -

जिल्ह्याची स्थिती
  एकूण तपासण्यात आलेले नमुने     २० हजार ३२७  
  अहवाल प्राप्त झालेले नमुने     १९ हजार ७४१ 
  एकूण पॉझिटिव्ह रुग्ण      २ हजार २९० 
  निगेटिव्ह अहवाल      १७ हजार ४४० 
  प्रलंबित अहवाल      ५६८ 
  ॲक्‍टिव्ह पॉझिटिव्ह     ६६०

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more 18 corona patients found in ratnagiri total count 20327