esakal | दुर्दैवी कोरोनाग्रस्त भावांना ग्रामपंचायतीचा 'आधार'; शेवटच्या घटकेला केले आईवर अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्दैवी कोरोनाग्रस्त भावांना ग्रामपंचायतीचा 'आधार'; शेवटच्या घटकेला केले आईवर अंत्यसंस्कार

दुर्दैवी कोरोनाग्रस्त भावांना ग्रामपंचायतीचा 'आधार'; शेवटच्या घटकेला केले आईवर अंत्यसंस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर : तालुक्‍यातील खोडदे येथे कोरोनाग्रस्त वृद्धेचे निधन झाले. दुर्दैवाने दोन्ही मुले कोरोनाग्रस्त असल्याने आपल्या आईच्या अखेरच्या प्रवासात मुलांना खांदा देता आला नाही. अशा कठीण प्रसंगात ग्रामपंचायत प्रशासन मदतीला धावले. सरपंच, उपसरपंचासह तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत लिपिक आणि अन्य एक कर्मचारी यांनी या महिलेवर अंत्यसंस्कार केले. या आठजणांनी कोरानाच्या संकटातही माणुसकीचे दर्शन देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

गुहागर तालुक्‍यातील खोडदे गावात कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचे निधन झाले. त्यांचा मोठा मुलगा रुग्णालयात कोरोनाशी लढत आहे तर धाकटा मुलगाही कोरोनामुळे गृह विलगीकरणात आहे. अशा परिस्थितीत अंतिम संस्कार कोणी आणि कसे करायचे? हा प्रश्न निर्माण झाला. आईवर अंत्यसंस्कार करू शकत नसल्याचे दु:ख धाकटा अनुभवत होता तर रुग्णालयात असणाऱ्या मोठ्याला आपली आई आपल्याला सोडून गेली आहे, याची माहितीसुद्धा नव्हती. सरपंच, उपसरपंचासह स्थानिक प्रशासनाने मायेचा आधार या कुटुंबाला दिला.

हेही वाचा: लसीच्या तुटवड्यामुळे नागरिक केंद्रावरून माघारी; दापोलीतील स्थिती

खोडदे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महेंद्र निमकर, तलाठी आनंद काजरोळकर, पोलिस पाटील महेश भाटकर, सरपंच प्रदीप मोहिते, उपसरपंच लवेश पवार, कोतवाल प्रकाश बोडेकर, ग्रामपंचायत लिपिक नितीन मोहिते, शिपाई वैभव निवाते या आठजणांनी अंतिम संस्कार केले. खोडदे गावाची स्मशानभूमी सुमारे 1.5 किमी दूर असल्याने तिथपर्यंत प्रेत न्यायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी गावातील एक छोट्या टेम्पोत प्लॅस्टिकमध्ये मृतदेह गुंडाळून स्मशानभूमीत नेला. स्थानिक मंडळींनी सरण रचून ठेवले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथून आणलेले पीपीई कीट वापरून अंत्यसंस्कार केले.

गुहागर नगरपंचायत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करत असल्याने तालुक्‍यातील काही ग्रामस्थ मृतदेह नगरपंचायतीच्या ताब्यात देण्यासाठी आले होते; मात्र खोडदे ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंचांसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी स्वत:हून पुढे आले. त्यांनी जपलेल्या माणुसकीचा आदर्श तालुक्‍यातील अन्य ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतीनी घेतला पाहिजे.

हेही वाचा: शेतकऱ्याला वळीवचा तडाखा; डोळ्यादेखत दीड एकराची बाग जमीनदोस्त

loading image