

Mukhyamantri Vayoshri Yojana
esakal
रत्नागिरी : वयाची पासष्टी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे आणि त्यांच्या वृद्धापकाळातील गरजांना आर्थिक मदतीचा बळकट हात मिळावा, या उद्देशाने राज्यशासनाच्या सामाजिक न्यायविभागामार्फत ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू केली. संपूर्ण जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. चालू आर्थिक वर्षात शासनाने या योजनेसाठी १६६.३० कोटी रुपयांच्या निधीची भरीव तरतूद केली आहे.
जिल्ह्यातील तब्बल १७ हजार ४२३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष तीन हजार रुपयांचे अनुदान वर्ग करून त्यांना मोठा दिलासा दृष्टिक्षेपात... योजना : राज्यशासनाची ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ (सामाजिक न्याय विभाग) पात्रता : ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आर्थिक मदत : तीन हजार रु. (थेट बँकखात्यात - DBT द्वारे) रत्नागिरीतील स्थिती : १७ हजार ४२३ पात्र ज्येष्ठांच्या खात्यात ३ हजार रुपयांचे अनुदान वर्ग उपयोग : चष्मा, श्रवणयंत्र, वॉकर, व्हीलचेअर, काठी, नी-ब्रेससारखी उपकरणे आणि समुपदेशन अर्ज कसा करावा : ‘आपले सरकार’/ ‘महा-ई-सेवाकेंद्र’ किंवा समाजकल्याण कार्यालय/पंचायत समिती दिला आहे.
वाढत्या वयासोबत येणारे शारीरिक आजार, असमर्थता किंवा अपंगत्वावर मात करण्यासाठी ही योजना वरदान ठरत आहे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या तीन हजार रुपयांच्या थेट अनुदानातून ज्येष्ठांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक असणारे चष्मा, श्रवणयंत्र, वॉकर, व्हीलचेअर, काठी आणि नी-ब्रेससारखी वैद्यकीय उपकरणे खरेदी करता येणार आहेत. केवळ शारीरिक व्याधींवरच नव्हे तर वाढत्या वयातील एकटेपणा आणि नैराश्यावर मात करण्यासाठी समुपदेशन केंद्रे व मनःस्वास्थ्याशी संबंधित उपक्रमांनाही या योजनेच्या चौकटीत मदत दिली जात आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा ‘महा-ई-सेवा’ केंद्रावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकृत पोर्टल, स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात थेट अर्ज जमा करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांचा मानसन्मान जपत त्यांचे जीवन स्वाभिमानी व सुकर करण्यासाठी ही योजना जिल्ह्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.