

Mumbai Goa Highway Traffic
Esakal
गणेशोत्सवानिमित्त मुंबई आणि पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणातील आपल्या गावी रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पनवेलमधील पळस्पे फाट्यावर कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तब्बल ८ ते ९ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.