Mumbai Goa Highway traffic jam during Ganeshotsav
esakal
देवरूख : गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक मुंबईकर कोकणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुण्यातून सोडण्यात आलेल्या एसटी बसेस, खासगी वाहने यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक वाढली आहे. माणगावसह चिपळूण परिसरात शनिवारी सायंकाळपासून रविवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेले प्रवासी अक्षरशः चार ते पाच विलंबाने गावाकडे पोचले. मुंबईहून रत्नागिरीत पोचण्यासाठी चौदा तासांहून अधिक काळ प्रवास करावा लागल्याचे प्रवाशांनी आवर्जून सांगितले.