Why were trees cut for Mumbai-Goa Highway?
esakal
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात १ लाख १५ हजार ६१६ झाडांची कत्तल झाली (Mumbai-Goa Highway tree cutting news) होती. पर्यावरण ऱ्हासावरून निर्माण झालेल्या तीव्र जनक्षोभानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने अधिकृत खुलासा केला आहे. परशुराम ते झाराप दरम्यान करण्यात आलेल्या १ लाख ९६ हजार ११२ झाडांच्या लागवडीचा लेखाजोखा कार्यकारी अभियंत्यांनी जाहीर केला आहे. सध्या सुकलेल्या व मृत झाडांच्या जागी आगामी पावसाळ्याच्या मध्यापर्यंत नवीन झाडे लावण्याचे आश्वासन दिले आहे.