चिपळूकरांनो रेमडेसिवीर इंजेक्शन हवे आहे, येथे साधा संपर्क

मुझफ्फर खान
Thursday, 24 September 2020

‘सकाळ’च्या वृत्ताची दखल

चिपळूणात रेमडेसिवीर पुरवण्यासाठी सरसावले मुंबई, पुणेकर

चिपळूण : चिपळूणातील कोरोनाग्रस्त रूग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यासाठी मुंबई, पुण्यातील अनेक डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी चिपळूणात 40 ते 70 हजार रुपये मोजावे लागत असल्याचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेवून बाजार दरात हे इंजेक्शन पुरवण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. 

कोरोना बाधित रूग्णांना आवश्यक असेल तर रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते. चिपळूणातील खासगी रूग्णालयात सरसकट रूग्णांना हे इंजेक्शन दिले जात आहे. पाच हजार 400 रुपये किमतीच्या या इंजेक्शनसाठी रूग्णांना कुठे 40 हजार तर कुठे 70 हजार रुपये मोजावे लागत आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने आज रत्नागिरी आवृत्तीच्या अंकात प्रसिद्ध केले. त्याची दखल मुंबईतील प्रताप पगार यांनी घेतली. त्यांनी सिप्ला कंपनीच्या टोल फ्री नंबरसह स्वतः हे इंजेक्शन बाजार दरात उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. 8657311088 हे सिप्ला कंपनीचे टोल फ्री नंबर दिले. येथे रूग्णांच्या नातेवाईकांनी फोन करून इंजेक्शनची मागणी केल्यास त्या रूग्णालयात हे इंजेक्शन बाजार दरात पुरवले जाईल. यामध्ये कोणतेही डीलर, डिस्ट्रीब्युटर किंवा रूग्णालयाचा सहभाग असणार नाही असे सांगितले.

हेही वाचा- कोकणात बिबट्याचा वावर  : चरवेलीत  विहिरीत पडलेल्या  बिबट्याला काढण्यात आले यश -

मुंबईतील सईद शेख यांनी म्हणाले,रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी एफडीएच्या मुंबईतील मुख्यालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कार्यरत नियंत्रण कक्षामधून रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर मागणी आणि त्याची पूर्ततेसंदर्भातील माहिती आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध होणार आहे. चिपळूणातील रूग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यासाठी आपण सहकार्य करू अशी ग्वाही दिली. 

अडरे (ता. चिपळूण) चे प्राथमीक आरोग्य केंद्राचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक राठोड सध्या पुण्यात सेवा देतात. त्यांच्यासह पुण्यातील डॉ. मनिष परदेशी यांनी कंपनीकडून बाजार दरात हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, कोरोनाबाधीत रूग्णांची संपूर्ण माहिती घेवून माझ्याशी संपर्क केल्यास मी बाजार दरात हे औषध उपलब्ध करून देईन. असे डॉ. राठोड यांनी सांगितले. 

हेही वाचा-रत्नागिरी ते रोहा कोकण रेल्वे धावणार विजेवर : आॅक्टोबर महिन्यात होणार चाचणी -

सध्या प्रत्येक कोविड संशयित आणि कोविडग्रस्त रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात आहे.  त्यामुळे त्याची मागणी भरपूर वाढली आहे. आरोग्य विभागाने टास्कफोर्समार्फत प्राटोकॉलप्रमाणे उपचार करताना रुग्णाची स्थिती बघूनच आवश्यक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करण्याचे निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांना देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही आणि गरजू रुग्णांना ते उपलब्ध होतील या हेतुने परिपत्रक जारी करणे गरजेचे आहे. 

सुनील शिर्के, लोटे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Punekar to supply Remdesivir in Chiplun