Mumbai to Sawantwadi Daily Express latest update
esakal
रत्नागिरी : कोकणातील रेल्वे प्रवासी, चाकरमानी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली (Konkan Railway new daily express train) आहे. ही गाडी सुमारे ५१० किलोमीटर अंतर दररोज पार करणार असून, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रवाशांना थेट व अधिक लाभदायक ठरणार आहे.