esakal | 'आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल'
sakal

बोलून बातमी शोधा

on navratri speech of CM uddhav thakre criticised by rane brohters in thakrye family in ratnagiri

मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!'' अशी टीका नितेश यांनी केली आहे. 

'आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल असे माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करुन ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे. काल दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण भाजपला व राणे बंधूंना चांगलेच झोंबले आहे. 

हेही वाचा - दोन तासांच्या थरारानतंर दोनशे फुट खोल दरीतुन श्रीकांतला बाहेर काढण्यात आले यश -

आमदार नितेश राणेंनीही उद्धव ठाकरेंवर दसरा मेळाव्यातल्या भाषणावर टीका केली आहे. ''काही जणांनी तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या ठाकरे कुटुंबावर केल्या. त्यांना मी सांगतो की, त्यांनी आता ते गिळावे अन गप्प बसावे. कारण आमचे हात स्वच्छ आहेत. स्वत: शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा अशी यांची पद्धत आहे,'' असे ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते. त्यावर नितेश यांनी टीका केली आहे. 


दुसऱ्याची पिल्लं वाईट, मग यांनी के त्या dino च्या खुशीत नशा करून मुलीवर अत्याचार करणारा श्रावण बाळ जन्माला घातला आहे का, असाही खोचक सवाल नितेश यांनी केला बिहारच्या आगोदरच पक्ष प्रमुखांनी व्हॅक्सिन घेतलेले दिसते, जास्तच हवा भरलेली आज, किती आव टाचणी तयार आहे फक्त योग्य वेळ येऊ द्या. इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!'' अशी टीका नितेश यांनी केली आहे. 

हेही वाचा - लुटायला या रे म्हणत कोकणात अशी होते सोन्याची लूट -

संपादन - स्नेहल कदम