
अणुस्कुरा घाट-विकासवाट : मालिका भाग १
रत्नागिरी जिल्हा आंबा घाटमार्गासह अणुस्कुरा घाटमार्गाने पश्चिम महाराष्ट्राला जोडला गेला आहे. राजापूर तालुक्यातून जाणारा अणुस्कुरा घाट शॉर्टकट म्हणूनही ओळखला जातो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी अणुस्कुरा घाट महत्त्वाचा ठरतो. अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलेल्या या घाटात दुर्मीळ निसर्गसंपदा आणि इतिहासकालीन ठेवा यांचा खजिना दडलेला आहे. त्यामुळे अणुस्कुरा घाट वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. वाहनचालकांसह पर्यटक आणि अभ्यासकांसाठी हा घाट पसंतीचा ठरत आहे. पावसाळ्यात आंबा घाटात दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली, तर अणुस्कुरा घाट पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरतो. मात्र, या घाटाच्या दुरुस्तीविषयी सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. पर्यटन वाढावे यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. अणुस्कुरा घाटाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही लेखमालिका आजपासून...
- राजेंद्र बाईत, राजापूर