रत्नागिरी : नियम धाब्यावर; रुग्ण वाऱ्यावर

सामाजिक कार्यकर्ते दळवींचा आरोप; रुग्णालयांकडून लूट, उपोषणाचा इशारा
corona rule
corona rulesakal

रत्नागिरी : शासनाने गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरळीत होत नाही. अनेक कोविड रुग्ण (corona patient)या योजनेपासून वंचित राहिले आहेत. संबंधित खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करीत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद दळवी यांनी केला आहे. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी संबंधित लाभार्थी, रुग्णांसह उपोषणाला बसू, असा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे.

corona rule
सोलापूर : शासनाने बाळंतपणासाठी दाखवली सरकारी रुग्णालयांची वाट

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविताना कशा प्रकारे गैरव्यवहार होत आहेत, भ्रष्टाचार सुरू आहे, रुग्णांची कशी लूट केली जात आहे, याचा सारा तपशील सादर केला आहे. नियम धाब्यावर बसवून ही योजना राबविली जात असल्याने गोरगरीब जनतेला तिचा लाभ होत नाही. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी. जिल्ह्यातील कोविड मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ते पात्र असूनही या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याकडुन वसूल केलेल्या बिलांची रक्कम नातेवाईकांना त्वरित परत करावी आणि संबंधित रुग्णालयांवर योग्य ती कारवाई करावी. याबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास प्रजासत्ताक दिनी संबंधित लाभार्थी, रुग्णांसह आपण उपोषणाला करू, असा इशारा दळवी यांनी यातून दिला आहे.(kokan news)

corona rule
जगण्यातील संघर्षाने दाखवली वृद्धाश्रमाची वाट

नोंदणीकृत हॉस्पिटलची हवी तपासणी

महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्ण म्हणून दाखल झाले व लाभार्थी असतानाही त्याच्याकडून बिल वसूल करण्यात आले आहे. त्यांचे पैसे परत करावेत, सर्वसामान्यांना योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, योजनेसाठी नोंदणीकृत हॉस्पिटलच्या कागदपत्रांची पडताळणी करावी, त्यासाठी एक कमिटी नेमून बिले तपासून पाहावीत, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com