कोरोनानंतर आता या आजाराने कोकणात घातलाय धुमाकुळ ; १८ जणांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

या रोगाचा संसर्ग वाढत असल्याने या आजाराने जिल्हावासीयांपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. 

रत्नागिरी : जिल्ह्यावर कोरोनापाठोपाठ सारी तापाचाही विळखा घट्ट होत चालला आहे. मागील साडेपाच महिन्यांत जिल्ह्यात सारीचे ९२७ रुग्ण आढळून आले आहेत, तर सारीने आतापर्यंत १४ रुग्णांचा बळी घेतलाय. त्यामुळे सारी रोगाचा संसर्ग वाढत असल्याने या आजाराने जिल्हावासीयांपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. 

सारीच्या तापामध्ये अनेक आजारांचा समावेश असून हा समूहरोग म्हणून गणला जातो. सारी आणि कोरोना हे वेगवेगळे आजार असले तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. सारीच्या रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन सूज येते. त्याचबरोबर न्युमोनिया होऊन रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण खालावते. त्यामुळे हृदय, मेंदू, किडनी निकामी होतात. शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने आजाराचे वेळेवर निदान होत नाही. त्यामुळे तापाचे जिवाणू, विषाणू रक्तात मिसळतात. रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही. 

हेही वाचा -  रत्नागिरीत सावरकरांच्या संगीत नाटकाला नव्वद वर्षे झाली पूर्ण 

जिल्ह्यात मागील साडेपाच महिन्यांपासून सारीचे आतापर्यंत ९२७ रुग्ण आढळून आले. यामध्ये ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये २४४ रुग्ण तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ६८३ रुग्णांचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्‍यात सर्वांधिक म्हणजे ३३६ रुग्ण आहेत तर सारी तापाने १४ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे नवे संकट उभे राहिले आहे. 
 

दृष्टिक्षेपात

- तापाचे जिवाणू-विषाणू रक्तात मिसळतात 
- रक्त तपासणीनंतरही निदान होत नाही  
- विषाणू अति सूक्ष्म तपासणीत दिसत नाहीत
- फुफ्फुसे बंद पडून हृदय, किडनीवर परिणाम 
- सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास  

हेही वाचा - सात महिने झालं, करताय तरी काय ? कोकणातील दहा लाख विद्यार्थी विचारत आहेत प्रश्न 

सारीची तालुकानिहाय आकडेवारी

   तालुका     सारी आजाराचे रुग्ण
  मंडणगड        ५५
  दापोली           ६२
  खेड               ६४
  चिपळूण         ३१
  गुहागर           २७
  संगमेश्वर         ८८
  रत्नागिरी         ३३६
  लांजा              ०८
  राजापूर           १२
 ग्रामीण रुग्णालये    २४४
  एकूण              ९२७

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new fever spread in konkan named is sari and 18 people was dead in ratnagiri