esakal | नवविवाहित महिलेची गळफास घेत आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

गळफास

नवविवाहित महिलेची गळफास घेत आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : सबनीसवाडा येथील राहत असलेल्या फ्लॅट मध्ये निधी निलेश पास्ते वय (29) हिने मंगळवारी गळफास घेत आत्महत्या केली या प्रकरणी तिचे पती सासू सासरेच जवाबदार असल्याचे तक्रार मुलीचे वडील प्रभाकर बापू माळकर (55) यांनी दिली होती त्यानुसार त्या तिन्ही संशयितांना अटक करून, आज न्यायालयात हजार केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती तापसी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी दिली.

हेही वाचा: सिंधुदुर्गातील शिक्षकांनी उभारला तब्बल 44 लाखाचा ऑक्सीजन प्लांट

निधी पास्ते हि नवविवाहित पतीसोबत सबनीसवाडा येथील एका बिल्डिंगच्या फ्लॅट मध्ये राहत होती. मंगळवारी रोजी पती बाजराला गेला असता निधी हिने घरात कोणीहि नसल्याची संधी साधून गळफास लावून आत्महत्या केली मात्र तिने पती सासरच्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेचे वडील प्रभाकर बापू माळकर यांनी दिली होती.

हेही वाचा: राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात पती निलेश ज्ञानेश्वर पास्ते (रा.सबनीसवाडा तुळजा आर्केट), सासरे ज्ञानेश्वर पांडुरंग पास्ते व निर्मला पास्ते यांच्यावर निधी पास्ते हिच्यावर क्रूर वागणूक, मानसिक छळ, मारहाण, शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार काल रात्री उशिरा पती निलेश पास्ते सासरे ज्ञानेश्वर पास्ते यांना अटक करण्यात आली तर आज सकाळी निर्मला पास्ते. यांना अटक करण्यात आली तिघांनाही आज येथील न्यायालयात हजार केले असता 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

loading image
go to top