सव्वाआठ पैकी सव्वाच दिलात, आता आम्ही मुलांना बसवायचे तरी कुठे ?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

कोरोनाचा सामना करत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

रत्नागिरी : ‘निसर्ग’ चक्रीवादळात जिल्ह्यातील ४७५ जिल्हा परिषद शाळांचे नुकसान झाले होते. त्यांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडून ८ कोटी ३० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता; मात्र शासनाकडून फक्त १ कोटी ३० लाख रुपये दिले आहेत.

जून महिन्याच्या सुरवातीलाच जिल्ह्यात ‘निसर्ग’ वादळाने हाहाकार माजवला होता. त्याचा सर्वाधिक फटका मंडणगड, दापोली आणि गुहागर तालुक्‍याला बसला होता. हजारो कोटी रुपयांचे नुकसान यामध्ये झाले. घरे, बागा, खासगी व सार्वजनिक कार्यालये उद्‌ध्वस्त झाली होती. हजारो कोटींचे नुकसान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासूनच सर्व शाळा व माध्यमिक विद्यालये बंद आहेत. या कोरोनाचा सामना करत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा -  एसटीला मिळणार ऊर्जितावस्था ; आता राज्यभरात उभारणार पेट्रोलपंप, कोकणचाही समावेश 

 

वादळामध्ये अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या इमारतींची पडझड झाली होती. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झाले नव्हते. दोनच दिवसांपूर्वी शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याची तयारी करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शाळांची दुरुस्ती तातडीने करणे अत्यावश्‍यक आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळात जिल्ह्यातील ४७५ शाळांचे नुकसान झालेले होते. काही शाळांचे पत्रे, कौले, छप्पर उडून गेले तर काहींच्या भिंती कोसळल्या आहेत. शैक्षणिक साहित्यासह डिजिटल क्‍लासरूमची पाण्यामुळे वाताहत झाली आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ६२ लाखाचा निधी आवश्‍यक आहे, असा प्रस्ताव शासनाकडे शिक्षण विभागाकडून पाठविला होता. गेल्या आठवड्यात शिक्षण विभागाला १ कोटी ३० लाख रुपये निधी मिळाला. शासनादेशानुसार शाळा सुरू झाल्या तर वादळग्रस्त भागातील मुलांना बसवायचे कुठे? हा प्रश्‍न आहे.

तालुका      शाळा

मंडणगड     १४३
दापोली        २१७
खेड              २४
गुहागर           १९
चिपळूण         ३०
संगमेश्वर         १६
रत्नागिरी          १९
लांजा               ३
राजापूर            ४

हेही वाचा -  धक्कादायक : म्हशीच्या पोटात चक्क ४५ किलोचा कचरा 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nisarg cyclone destroyed various primary schools government declared 8 crore 30 lakh but exact amount 1 crore 25 lakh in ratnagiri