
..अन्यथा टाडा सुद्धा लावला असता; राणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद
ओरोस - शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सुमारे पावणे दोन तास यावर सुनावणी सुरू असून नितेश राणे यांचे वकील संदीप मानशिंदे यांनी बाजू मांडताना 'नशीब टाडा रद्द झाला आहे, अन्यथा टाडा सुद्धा लावला असता' अशा प्रकारची नाराजी पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटक होऊ नये, यासाठी भाजपाते नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळताना जामीन जिल्हा व सत्र न्यायालयातून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २८ जानेवारी रोजी आ राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज दाखल करून घेताना न्यायालयाने सोमवारी यावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते.
हेही वाचा: नितेश राणेंच्या नियमित जामिन अर्जावर सोमवारी होणार फैसला
त्यानुसार आज सकाळी ही सुनावणी सुरू झाली आहे. नितेश राणे स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत माजी खासदार निलेश राणे हेही उपस्थित आहेत. तसेच विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी हे सुद्धा उपस्थित असून आमदार राणे यांच्यावतीने प्रख्यात वकील संदीप मानशिंदे, संग्राम देसाई व अन्य वकील उपस्थित आहेत. यावेळी जामीन मिळण्यासाठी बाजू मांडताना संदीप मानशिंदे यांनी "पोलिसांनी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले आहे, ते पाहता टाडा कायदा असता तर तो सुद्धा लावला असता", असे दिसत असल्याचे सांगितले.
हेही वाचा: वाइन उद्योगाबद्दल राऊत यांना ज्ञान आहे का? सोमय्यांचा उपरोधिक टोला
Web Title: Nitesh Rane Advocate Not Satisfied Of Police Checking Of Says Tada Law
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..