esakal | रिक्षा - मोटारीच्या धडकेत वृद्धा ठार 
sakal

बोलून बातमी शोधा

Old Women Death In An Accident Ratnagiri Marathi News

रिक्षा (एमएच-08-एक्‍यू-3506) ही इंदवटी (ता. लांजा) येथून रत्नागिरीला चालली होती. त्यातून चालक राजेश बाळकृष्ण पवार (वय 36) हे आपली आई लक्ष्मीबाई बाळकृष्ण पवार (वय 75) यांना घेऊन रत्नागिरीला दवाखान्यात चालले होते.

रिक्षा - मोटारीच्या धडकेत वृद्धा ठार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर रिक्षा चालक आईला घेऊन रत्नागिरीत दवाखान्यात येत असताना चरवेली येथे रिक्षा व मोटारीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षातील महिलेचा मृत्यू झाला. रिक्षाचालक मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 21) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास चरवेली रस्त्यावर घडली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा (एमएच-08-एक्‍यू-3506) ही इंदवटी (ता. लांजा) येथून रत्नागिरीला चालली होती. त्यातून चालक राजेश बाळकृष्ण पवार (वय 36) हे आपली आई लक्ष्मीबाई बाळकृष्ण पवार (वय 75) यांना घेऊन रत्नागिरीला दवाखान्यात चालले होते. पाली-चरवेली रस्त्यावर रिक्षाची समोरून येणारी मोटार (एमएच-08-केजी-3312) यांच्यात धडक झाली. मोटार रत्नागिरीहून कोल्हापूरला निघाली होती. विनय अमृत गोसावी (वय 30, आठवडा बाजार, रत्नागिरी) हे मोटार चालवत होते. 

गोसावी हे सहकुटुंब कोल्हापूरला बहिणीकडे चालले होते. अपघातात रिक्षातील आई-मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने दोन्ही जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी लक्ष्मीबाई पवार यांना तपासून मृत घोषित केले. गंभीर जखमी मुलगा राजेश पवार याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी झाली होती. पाली दूरक्षेत्र पोलिसात अपघाताची नोंद केली आहे. हेडकॉन्स्टेबल संजय झगडे तपास करीत आहेत.