esakal | असे करा कोविड 19 मध्ये उद्भवणाऱ्या ताणतनावाचे व्यवस्थापन
sakal

बोलून बातमी शोधा

one day online webinar mandangad

नियमांचे पालन केले की सुरक्षित, निरोगी व आनंददायी जीवन जगता येते...

असे करा कोविड 19 मध्ये उद्भवणाऱ्या ताणतनावाचे व्यवस्थापन

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : कोविड-19 मुळे अख्खं जग थांबले आहे. कोरोनाची खूप भीती लोकांमध्ये आहे. अति भीतीमध्ये माणसाच्या शरीरामध्ये विष निर्माण करण्याची प्रचंड शक्ती असते आणि हीच शक्ती माणसाला संपविते. म्हणून घाबरून प्रश्नांचे निराकरण होत नाही. शरीर, बुध्दी, मन व मेंदू यांचा योग्य समतोल राखणे हे अतिशय महत्वाचे असते. मनातील भीती काढून या वेगवान मनाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर नियमांचे पालन केले की सुरक्षित, निरोगी व आनंददायी जीवन जगता येते. असे भारत सरकारच्या विमुक्त, घुमंतू व अर्धघुमंतू जनजाति विकास कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी सांगितले.

हेही वाचा-रत्नागिरीत चाकरमान्यांच्या प्रवेशासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची सूचना... -

मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने कोविड-19 नंतर उद्भवणाऱ्या ताण तनावाचे व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय आॅनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुभाष सावंत होते. मार्गदर्शक म्हणून रत्नागिरी येथील विभागीय मनोरूग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. संजयकुमार कलकुटगी व समाजसेविका स्वाती भोसले कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, संचालक विष्वदास लोखंडे, संतोष चव्हाण, आदेश मर्चंडे, उपप्राचार्य डाॅ. वाल्मिक परहर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा- दरड कोसळली ; कोंकण रेल्वे मार्गावरील या पाच गाड्या मिरजमार्गे वळवल्या -

 मार्गदर्शन करताना डाॅ. संजयकुमार कलकुटगी म्हणाले, की कोविड 19 ही जागतिक महामारी आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सगळा व्यवहार ठप्प आहे. आर्थिक चणचण आहे, सामाजिक संपर्क तुटला आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ लागली आहे. केव्हा एकदा आपल्यावर घाला पडेल याची मोठी चिंता आहे. यातून मानसिक आरोग्यावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्यापर्यंत हा आजार येणार नाही याची काय काळजी घ्यावी लागेल, त्याची लक्षणे काय असतात याची सविस्तर माहिती छोटयाछोटया उदाहरणांच्या माध्यमातून डाॅ. कलकुटगी यांनी पटवून दिली.

अतिकाळजीमुळे नैराष्य येते. त्यातून विकृती वाढते, निद्रानाश  होतो. आणि एकूण आपल्या जगण्यावर त्याचा विपरित परिणाम होतो. अशा अवस्थेत  लेखन, गायन, वादन, चित्रकला असे विविध प्रकारचे छंद जोपासणे हे तितकेच गरजेचे असते. स्वाती भोसले यांनी सांगितले, की आपली मानसिकता ही चांगली असायला हवी, अन्यथा आजाराला कधी बळी पडू शकतो हे सांगता येणार नाही. योग, प्राणायाम, ध्यानधारणा, योग्य आहार याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आजार होणार नाही व आपल्यापासून दुस-यालाही त्याची लागण होणार नाही याची काळजी प्रत्येकांनी घेतली पाहिजे.

हेही वाचा- रत्नागिरीत जयगड कळझोंडी पुलाचा भाग ढासळला, घराला गेले तडे -

आजच्या बिकट परिस्थितीत स्वयंशिस्त पाळली की काहीही होणार नाही.  यावेळी सहभागी प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना  समाधानकारक उत्तरे  देण्यात आली. या कार्यक्रमास संस्थापदाधिकारी, संचालक, महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आंबडवे, कुंबळे व असोंड येथील प्रशाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच अन्य महाविद्यालयातील प्राध्यापक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. संगीता घाडगे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. हनुमंत सुतार यांनी मानले.

संपादन - अर्चना बनगे

loading image