दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; डॉक्‍टरचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. डॉ. नामदेव पवार ( रा. नरडवे पायरवाडी ) असे मृत्यू झालेल्या चुचाकीस्वाराचे नाव आहे.

कणकवली : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. डॉ. नामदेव पवार ( रा. नरडवे पायरवाडी ) असे मृत्यू झालेल्या चुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. 

हे पण वाचा -  त्याला आला मित्राचा फोन म्हणून गेला बाजारपेठेत आणि....

याबाबत अधिक माहिती अशी, निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. पवार हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात डॉ. पवार गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बध्यांची प्रचंड गर्दी झाली. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलविले. परुंतु. उपचार सुरू असतानाच डॉ. पवार यांचे मृत्यू झाला. 

हे पण वाचा - वसतिगृहात हजेरीपत्रकावर मारल्या सह्या परंतु.....

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक रूग्णालयाबाहेर जमा झाले. डॉ. पवार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत करताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. उत्तरीय तपासनीनंतर डॉ. पवार यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात येणार असून धडक दिलेल्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहीत डॉ. पवार यांच्या नातेवाईकांनी दिली. 

हे पण वाचा - आता बस्स... हिंगणघाट घटनेवरून संभाजीराजे संतापले 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in accident at kankavli