Ratnagiri : रत्नागिरीतील पाकिस्तानी नागरिकांचा वाढला मुक्काम; परतीच्या मार्गावरून सुटका, नेमकं काय घडलं..

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिस दलाला सतर्कतेचे आदेश दिले. अनुषंगाने जिल्ह्यात कोणी पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहेत का, याचा शोध घेण्यात आला.
Officials verifying documents of Pakistani nationals at Ratnagiri during their extended stay and return clearance.
Officials verifying documents of Pakistani nationals at Ratnagiri during their extended stay and return clearance.Sakal
Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यात असलेल्या तीन पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा दीर्घकाळासाठी आहे. त्यांची पूर्ण चौकशी करण्यात आली आहे. भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या मोहिमेतून या तिघांना सवलत आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील त्यांचा मुक्काम वाढला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिस दलाला सतर्कतेचे आदेश दिले. अनुषंगाने जिल्ह्यात कोणी पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहेत का, याचा शोध घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यात तीन पाकिस्तानी नागरिक (महिला) वास्तव्याला असल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तींवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. भारताने अजून त्यांना नागरिकत्व दिलेले नाही. त्यांना परत पाठवायचे का, याबाबत मार्गदर्शन मागविले होते. तसेच जिल्ह्यात सुरक्षेमध्ये आणि गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद भारतात उमटू लागले आहेत. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध आणि संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यात लग्न करून आलेल्या तीन पाकिस्तानी महिला आहेत. त्यांनी पाकिस्तानी पासपोर्ट जमा केला असून, भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी अर्ज केला आहे; परंतु अजून त्यावर विचार झालेला नाही. त्यामुळे या परिस्थितीत आणि देशाने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेच्या अनुषंगाने त्यांना परत पाकिस्तानमध्ये पाठवायचे का, याबाबत शासनाकडून पोलिसदलाने मार्गदर्शन मागवले होते; परंतु त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे दीर्घकालीन व्हिसा आहे. त्यांची मुदत अजून काही वर्षे आहे. त्यामुळे भारतातून त्यांना परत पाठवण्याच्या मोहिमेतून त्यांना सवलत मिळाली आहे. भविष्यात व्हिसा संपल्यानंतर त्याचा विचार केला जाईल, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील तीन पाकिस्तानींचा मुक्काम वाढला आहे.

पोलिस अलर्ट

पाकिस्तान आणि भारताच्या बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दल सतर्क आहे. जिल्ह्यातील सर्व चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरू केली आहे. महत्त्वाच्या सार्वजनिक, पर्यटनस्थळी बंदोबस्त वाढविला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सागरी सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. कस्टम, तटरक्षक दलाची मदत घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com