esakal | कळसुत्री बाहुल्याच बनल्या सन्मानाचे प्रतीक: परशुराम गंगावणे यांना मिळवून दिला पद्मश्री
sakal

बोलून बातमी शोधा

Parashuram Vishram Gangavane  insidhudurg story by archana banage kokan marathi news latest news

काल  केंद्र सरकारकडून विविध पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये  परशुराम विश्राम गंगावणे यांचे नाव आहे.  गंगावणे हे नेमके कोण आहेत  हे नेटीजन्स शोधत आहेत. नेमका काय आहे त्यांचा प्रवास जाणून घेऊया  ....

कळसुत्री बाहुल्याच बनल्या सन्मानाचे प्रतीक: परशुराम गंगावणे यांना मिळवून दिला पद्मश्री

sakal_logo
By
अजय सावंत

सिंधुदुर्ग : कोणाचा काय छंद असेल ते सांगता येत नाही. याला पैशाची जोड लागतेच अशी नाही. छंदवेडी लोक काहीही करु शकतात. या  छंदापाइच सिंधुदुर्गातील एका अवलीयाला हा प्रवास पद्मश्रीपर्यंत घेऊन गेला आहे. काल  केंद्र सरकारकडून विविध पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये  परशुराम विश्राम गंगावणे यांचे नाव आहे.  गंगावणे हे नेमके कोण आहेत  हे नेटीजन्स शोधत आहेत. नेमका काय आहे त्यांचा प्रवास जाणून घेऊया  ....

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सांस्कृतिक लोककलांचे माहेरघर असणाऱ्या पिंगुळी गुढीपुर येथील 
परशुराम विश्राम गंगावणे हे गेले  45 ते 50 वर्षे हे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारीक लोककला जतन व प्रसार करण्याचे काम करीत आहेत. कठिण परिस्थीतीमध्ये त्यांनी ही लोककला जपुन ठेवली. 

गुरांच्या गोठ्यामध्ये केली सुरुवात

ठाकर आदिवासी कला आंगण Museum & Art Gallery हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे. जे 03 मे 2006 ला सुरू झाले. हे म्युझियम त्यांनी गुरांच्या गोठ्यामध्ये सुरु केले.  शिवाजी महाराजांच्या राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहिशी झाली होती. ती कला जतन करण्याचे काम  परशुराम गंगावणे यांनी केले. 


काय आहे  संग्रहालयात 
या संग्रहालयात सिंधुदुर्ग चा ठाकर आदिवासी समाजाचा पारंपरिक लोककला 
कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, 
चामड्याच्या बाहुल्या,पांगुळ, बेल
डोना वाद्य,गोंधळ
,पोथराज अशा लोककलेचं मांडणी केली आहे. 

संग्रहालयात हे शिकू शकता 
 
भारतात पर्यटक घेऊन फिरणारी रेल्वे  डेक्कन ओडिसी येथील पर्यटक सिंधुदुर्ग जिल्यातील या कला आंगण येते भेट देतात. सिंधुदुर्ग जिल्हा हा Cultural Tourism म्हणून पुढे यावा यासाठी परशुराम गंगावणे ठाकर आदिवासी कला आंगण च्या माध्यमातुन काम करत असतात.या ठिकाणी रहिवासी कार्यशाळा सुद्धा आयोजित केल्या जातात, ज्या मध्ये तुम्ही या कला आंगण चा सुंदर homestay ला राहून ही कला शिकू शकता.तसेच पारंपारीक कोकण संस्कृती येथे कला आंगण ला दाखविली जाते.

 परशुराम  गंगावणे यांच्याविषयी

गंगावणे यांना महाराष्ट्र पर्यटनचा सिंधुदुर्ग पर्यटन मित्र पुरस्कार  प्राप्त झालेला आहे.असे अनेक राज्य व इतर राज्य पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत या संग्रहालयात आता देश विदेशी पर्यटक भेटी देत असतात, सोबत विविध शैक्षणिक सहल सुद्धा भेटी देतात, गंगावणे यांनी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या चॅरीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातुन बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती , स्वच्छ भारत अभियान एड्स जनजागृती अशा अनेक विषयावर कळसुत्री बाहुल्यांच्या  माध्यमातुन कार्यक्रम केले आहेत.  या लोककला जतन व संवर्धन करण्याच काम पारंपरिक लोककलाकार परशुराम विश्राम गंगावणे 
व त्यांचे दोन्ही चिरंजीव एकनाथ गंगावणे व चेतन गंगावणे करीत आहेत.

या लोककला जतन व संवर्धन करत असताना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत त्यांना चित्रकथी व कळसूत्री बाहुल्यांसाठी गुरू म्हणून नेमले आहे. यासाठी भारत सरकारचा गुरू शिष्य परंपरा या योजने अंतर्गत त्यांनी 8 कार्यशाळेतून 150 हून अधिक विध्यार्थी तयार केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश म्हणजे इयत्ता 10 चा इतिहास या विषयात चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्या यांचा एक भाग ही आलेला आहे. अनेक पिएचडी करणारे अभ्यासक  तसेच शाळेच्या शैक्षणिक सहली कला आंगण ला भेटी देत असतात. 

गेली ४५ ते ५० वर्षे लोककलेचे जतन केले, तपश्चर्या केली. त्यांचे उशिरा का होईना फळ मिळाले. वयाच्या १२ व्या वर्षी ही कला गुरांच्या गोठ्यात जोपासली. या पुरस्काराने माझ्या पिंगुळी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशात माझ्या चेतन व एकनाथ या दोन्ही मुलांचे फार मोठे योगदान आहे. 
- परशुराम गंगावणे


संपादन- अर्चना बनगे

loading image