crime
crimegoogle

पोलिसांचा गनिमी कावा; जुगार अड्ड्यावर छापा, २० जण ताब्यात

ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये कणकवलीसह कुडाळ मालवण मधील काहींचा समावेश आहे.

कणकवली - पोलिसांनी माळराणावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली. यात वीस जणांना ताब्यात घेण्यात आले असून सव्वा लाखाच्या रोख रकमेसह १३ मोटार सायकल व दोन चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये कणकवलीसह कुडाळ मालवण मधील काहींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

crime
'रामनवमीच्या मिरवणुका आता पाकिस्तानात काढायच्या का?'

कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, पोलिस हवालदार दाजी सावंत, पांडुरंग पांढरे, चंद्रकांत झोरे, चंद्रकांत माने, रुपेश गुरव, मनोज गुरव, किरण कदम, किरण मेथे, कैलास इम्फाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील नागवे रोड लगतच्या निम्मेवाडी उचवळा या ठिकाणी हा जुगार अड्डा सुरु होता. विशेष म्हणजे पोलिसांनी गनिमी काव्याचा वापर करत रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या खबऱ्यांना कोणतीही कल्पना लागू न देता ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, उघड्या माळरानावर सुरू असलेल्या जुगारात पोलिसांनी वीस जणांना ताब्यात घेतले. परंतु उघडे माळरान व अंधाराचा फायदा घेत काहींनी पलायन केले असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com