

Police Corruption News
esakal
Money Scam Maharashtra Police : चिपळूण येथील टीडब्लूजे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचे प्रकरण आता पोलिस प्रशासनाच्या रडारवर आले आहे. या कंपनीत अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याची माहिती समोर आल्यानंतर रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.