esakal | नागरिकांच्या 'आरोग्या'साठी खाकी आली धावून; पोलिसांनी वेळासला घेतलं 'दत्तक'!

बोलून बातमी शोधा

नागरिकांच्या 'आरोग्या'साठी खाकी आली धावून; पोलिसांनी वेळासला घेतलं 'दत्तक'!
नागरिकांच्या 'आरोग्या'साठी खाकी आली धावून; पोलिसांनी वेळासला घेतलं 'दत्तक'!
sakal_logo
By
सचिन माळी.

मंडणगड : आरोग्य यंत्रणा आपले कर्तव्य पार पाडताना त्यांना मदतीचा हात देता यावा म्हणून आता पोलिसांनी नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून एक गाव दत्तक घेत बाणकोट सागरी पोलिसांनी वेळास येथील नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजन व तापमान तपासले.

कडक लॉकडाऊन नंतरही ग्रामीण भागातील केारोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता आता पोलिसांनीही आरोग्य यंत्रणे प्रमाणे घरोघरी जावून काम सुरू केले आहे. त्याआधी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासण्या करण्यात आल्या आहेत. बाणकोट सागरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम पिठे यांच्या टिमने बुधवार (28) रोजी वेळास हे गाव दत्तक घेतले आहे.

दांडा परिसरातील ग्रामस्थांच्या घरी जावून ग्रामस्थांच्या ऑक्सिजन व तापमान तपासले व लोकांना कोरोना संदर्भातील सोशल डिस्टन्सिंग पाहणे, मास्क वापरणे, गावातील लोकांच्या कोरोना चाचण्या वाढवणे, कुणाला सर्दी तापाची लक्षणे असतील तर रुग्णालयात पाठवणे अशी जनजागृती केली. कोरोनापासून घ्यायच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कोरोनासंदर्भातील शासनाच्या नियमांचे पालन कसे करावे यासंदर्भात सूचना केल्या.

हेही वाचा: प्रशासनाची तारांबळ; अँटिजेन पॉझिटिव्ह येताच मुलांना घेऊन दोन महिलांचा पळ

ग्रामीण भागातील लोक ताप सर्दी असले तर दवाखान्यात जात नाहीत. त्यामुळे कोरोना संदर्भातील तपासण्या वेळेत होत नाहीत. परिणामी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. पोलिसांच्या या उपक्रमामुळे गावातील लोकांच्या आरोग्य संदर्भातील माहिती शासनाला मिळणार असून वेळीच उपचार होण्यास मदत होणार आहे.

"कोविड 19 बद्दल जागरूकता कशी येईल असे उपक्रम राबवून कोरोना चेन तोडण्यासाठी पोलिस स्टेशन स्तरावर प्रयत्न होणे जरुरीचे होते. कारण मॅन टू मॅन संपर्क झाल्याशिवाय हे काम होणार नाही. म्हणून पोलिस अधीक्षक सर डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या आदेशानुसार वेळास गाव दत्तक घेऊन वेळास दांडा येथील 50 नागरिकांची तपासणी केली. त्यात 1 नागरिक यांची ऑक्सिजन लेव्हल 75 आणि टेम्प्रेचर 101 आढळल्याने तात्काळ देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत."

- उत्तम पीठे, पोलिस निरीक्षक