रत्नागिरीत 40 हजाराचा गांजा जप्त; अट्टल गुन्हेगाराला बेड्या

आत्तापर्यंत रत्नागिरी शहरात गांजा बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने तीन गुन्हे तर जिल्ह्यात एकुण सात गुन्हे दाखल झालेले आहेत.
cannabis
cannabis e sakal

रत्नागिरी : शहराजवळील मिरकरवाडा येथून 40 हजार 740 रुपये किंमतीचा 2 किलो 37 ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर समुद्र किनारी परीसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस गस्त घालत होते. मिरकरवाडा येथील जुनी पोलीस चौकीसमोरील रस्त्यावर काही संशयास्पद हालचाली होत असल्याचे लक्षात आले. (police seize 2 kg cannabis and arrest 1 accused in Ratnagiri)

पोलिसांना मोहंमद ताहीर इब्राहीम मस्तान (रा.- वरचा मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) हा अट्टल गुन्हेगार तिथे दिसून आला. त्याच्याकडून 2 किलो 37 ग्रॅम गांजा व अन्य साहीत्य असा 40 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस हवालदार बाळू पालकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित म्हणून मोहंमद याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

cannabis
दिव्यांग रुपेश यांच्या जिद्दीला सलाम! गादी वाफ्यावर केली भात पेरणी

या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग यांनी अभिनंदन केले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सुभाष भागणे, मिलींद कदम, शांताराम झोरे, बाळू पालकर, अरुण चाळके , प्रशांत बोरकर, अमोल भोसले, रमीज शेख यांनी केली.

दरम्यान, 2021 मध्ये आत्तापर्यंत रत्नागिरी शहरात गांजा बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने तीन गुन्हे तर जिल्ह्यात एकुण सात गुन्हे दाखल झालेले आहेत. तरुण पिढीत मोठ्याप्रमाणात गांजा ओढला जात आहे. त्यावर आळा घालण्यासाठी गेल्या दोन वर्षात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याचाच भाग म्हणून अधूनमधून या प्रकरणातील कारवाया सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com