सत्ताधाऱ्यांची लवकरच पोलखोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परशुराम उपरकर

कुडाळ : सत्ताधाऱ्यांची लवकरच पोलखोल; परशुराम उपरकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : सत्ताधाऱ्यांनी सर्वच बाबतीत जनतेला कसे फसवले, याची पोलखोल करण्यासाठी २४ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता येथील बाजारपेठेत ढोलताशे वाजवून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पोलखोल यात्रा काढणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची येथील तालुक्याची बैठक माजी आमदार उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी प्रसाद गावडे, कुणाल किनळेकर, बाळा पावसकर, आपा मांजरेकर, बाबल गावडे, दीपक गावडे, गुरू मर्गज, हितेंद्र काळसेकर, रामा सावंत, सुंदर गावडे, सचिन सावंत, रमा नाईक, सचिन ठाकूर, सत्यविजय कवीटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: सोनेगाव डिफेन्स परिसरात पुन्हा बिबट्या!

श्री. उपरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच शिवसेनेचे आमदार, खासदारांनी आतापर्यंत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. जिल्ह्यातील असा एकही गाव नाही, जेथे रस्त्यांवर खड्डे नाहीत; मात्र या खड्डयांसाठी कोट्यावधीची निधी आल्याचे मंजूर झाल्याचे या शिवसेनेच्या पालकमंत्री आमदार, खासदारांकडून सांगितले जाते. त्यांच्या या फसव्या घोषणांची पोलखोल रॅलीच्या माध्यमातून केली जाणार आहे. मुळात राज्याकडून येणारा निधी हा नियोजन समितीमध्ये कशाप्रकारे खर्च केला जाईल याचे नियोजन केले जाते; पण पालकमंत्री सामंत यांनी गेले नऊ महिने नियोजन समितीची बैठक घेतलेली नाही.

मग अहवाल कसा तयार होणार आणि निधी कसा खर्च होणार? यामध्ये पालकमंत्री सामंत यांची चूक आहे. दर तीन महिन्याने नियोजन समितीची सभा घेणे क्रमप्राप्त आहे. सरकारकडून आलेल्या निधीचे नियोजन करणे हे या नियोजन समितीच्या सभांमध्ये ठरविले जाते. पालकमंत्री सामंत यांनी सभा घेतल्या नाहीत. जिल्ह्याच्या विकासाचा निधी मागे जाण्यास पालकमंत्री जबाबदार आहेत."

हेही वाचा: नागपूर : नातेवाईकांनाच साडेतीन कोटींनी चुना

जनतेचा निधी पाण्यात

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची मंजुरी नाकारली आहे. मेडिकल कॉलेज मंजूर होण्याआधीच कोट्यवधीचा निधी खर्च झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी रंगरंगोटी करून भाडेतत्त्वावर कर्मचारी आणून कॉलेजची मंजुरी मागत होते; मात्र ही मंजुरी नाकारली आहे. जनतेचा कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात घालण्याचे काम शिवसेनेचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी केले आहे, असे उपरकर म्हणाले.

loading image
go to top