esakal | पोसरेत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 17 जण बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

पोसरेत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 17 जण बेपत्ता

पोसरेत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 17 जण बेपत्ता

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी : खेड पोसरे येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गाडल्या गेलेल्या 17 जणांचे मृतदेह काढण्यात यश आले आहे. यामध्ये सात घरे दरडीखाली गाडली गेली होती. अजून शोधकार्य सुरु आहे. यामध्ये सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळाल्या माहितीनुसार, खेड पोसरे येथे काल (23) झालेल्या दरड दुर्घटनेतील मृतांमध्ये पुढील लोकांच समावेश आहे.

हेही वाचा: दरड कोसळली; आंबा घाट वाहतूकीसाठी बंद

यात श्रीमटी रंजना रघुनाथ जाधव (वय -50), रघुनाथ जाधव (वय -55), विकास विष्णु मोहिते (वय 35), श्रीम संगिता विष्णु मोहिते ( वय -69), सुनिल धोंडीराम मोहिते (वय -47 ), सुनिता धोंडीराम मोहिते (वय -42), आदेश सुनिल मोहिते ( वय -25), श्रीम.काजेल सुनिल मोहिते (वय -19 ), श्रीम सुप्रिया सुदेश मोहिते (वय -26), कु विहान सुदेश मोहिते (वय 5), धोडीराम देवू मोहिते (वयं 71 ), श्रीम सविता धोडीराम मोहिते (वय -69), वसंत धोडीराम मोहिते( वय -44), श्रीम वैशाली वंसत मोहिते (वय -40), कु. प्रिती वसंत मोहिते (वय 9), सचिन अनिल मोहिते (वय 29), श्रीम सुमित्रा धोडू म्हापदी (वय 69) यांचे मृतदेह सापडले आहेत.

या दुर्घटनेत जखमी झालेल्यांत अनिल रघुनाथ मोहिते वय -49, वसंती रघुनाथ मोहिते वय -68, प्रिती सचिन मोहिते वय -27, सुरेश अनिल मोहिते वय -27, सनी अनिल मोहिते वय -25, सुजेल वसंत मोहिते वय -18. विराज सचिन मोहिते वय -4 यांचा समावेश आहे. तालुका मंडणगड पान्हळे खु. येथे बाळराम गोविंद काप यांचा बैलनदीच्या प्रवाहात वाहून गेल आहे. शोधकार्य चालु आहे. लाटवण येथे पुल खचल्यामुळे महाड - मुंबई -पुणे रस्ता बंद आहे. मुगीज येथे जि. प. शाळ नं 1 च्या भिंतीवर आंब्याचे झाड पडून नुकसान रु 6500 नुकसान झाले आहे.

हेही वाचा: Konkan Railway Update - पाणी ओसरलं; कोकण रेल्वे पुन्हा सुरु

loading image
go to top