esakal | चाकरमान्यांना दिलासा ; कोकणात जाण्यासाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

possibilities of special trains for konkan people or chakarmani

कात्रित सापडलेल्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे.

चाकरमान्यांना दिलासा ; कोकणात जाण्यासाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची शक्यता

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : कोविड-१९ च्या संकटामुळे रेल्वेची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला जाण्यासाठी रस्ता वाहतुकीचा पर्याय आणि त्यात मुसळधार पाऊस यामुळे कोकणात पोहोचायचे कसे, असा प्रश्न मुंबईकर चाकरमान्यांना पडला होता. त्यात ई-पासचे बंधन होते. त्यामुळे कात्रित सापडलेल्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकणात गणपती सणासाठी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सज्जता ठेवण्यात येत आहे. 

हेही वाचा - फसवणूक भरपूर; न्याय मात्र दूर...

राज्य सरकारकडून कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी विशेष एसटी गाड्या सोडल्या जात आहेत. यासाठी सुमारे ३ हजार एसटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यात २२ प्रवाशांच्या ग्रुप बुकिंगचा पर्यायही ठेवण्यात आला. मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्याने काही गाड्या कालपासून कोकणच्या वाटेवर मार्गस्थ झाल्या असतानाच गणपती विशेष रेल्वेसंदर्भात बातमी चाकरमान्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणपतीसाठी विशेष गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने सुरु केल्याची माहिती मिळते.

राज्य सरकारच्यावतीने मध्य रेल्वेला पत्र दिले गेले आहे. या पत्राला रेल्वेकडून प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येते. येत्या दोन दिवसांत कोकण रेल्वे मार्गावर काही विशेष गाड्यांबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या गाड्यांसाठी आरक्षण असेल आणि तिकीट हाच ई-पास मानला जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे सुरु झाल्या तर कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी जाता येणार आहे.

हेही वाचा -  सिंधुदुर्गनगरीमध्ये पाणीपुरवठा विभागाकडून या कामासाठी दिरंगाई...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थर्मल स्क्रीनिंग, सोशल डिस्टन्सिंग तसेच रेल्वे सॅनिटायझर करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देशही दिले आहेत. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर गाड्या नेमक्या कोणत्या तारखेपासून सोडल्या जाणार आहेत ?या गाडीतून जाणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाइन कालावधी किती असणार ? याबाबत मात्र लवकरच घोषणा होऊ शकते.

२२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. यासाठी १४ दिवसांची क्वारंटाईनची अट ठेवली होती. त्यात घट करुन १० दिवसांची करण्यात आली आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींचा विरोध असल्याने ही अट १४ दिवसांचीय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी खासगी वाहनाने कोकण गाठले. त्यापाठोपाठ नुकतीच एसटी सोडण्याचीही घोषणा करण्यात आली. आता रेल्वे सुरू झाल्यास चाकरमान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

संपादन - स्नेहल कदम

loading image