पोल्ट्री उद्योगाला पुन्हा अच्छे दिन

poultry business increased nowadays in ratnagiri also rate of chicken and eggs increases
poultry business increased nowadays in ratnagiri also rate of chicken and eggs increases

चिपळूण : कोरोनाचा प्रसार चिकन आणि अंडी यांमधून होत असल्याच्या अफवांमुळे संकटात सापडलेल्या पोल्ट्री उद्योगाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. चिपळूणच्या किरकोळ बाजारातील चिकनचा दर पुन्हा १८० ते २०० रुपयांवर पोहोचला आहे. तर पोल्ट्री उत्पादकाला मिळणारा दर १०० रुपयांपर्यंत गेला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या घाऊक बाजारात अंड्यांचे दरही वधारले असून प्रति डझन ७० रुपये भावाने विक्री होत आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पोल्ट्री फार्मवरील प्रति किलोचा चिकनचा दर ८० रुपयांवरून २० रुपयांपर्यंत उतरला. मात्र, खर्च ६५ ते ७० रुपयांदरम्यान असताना किमती कमी झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना प्रत्येक किलोमागे ४० रुपयांचा तोटा सहन करावा लागला. त्यात लॉकडाऊन झाल्यानंतर आधीच नुकसानात गेलेल्या व्यावसायिकांनी नवीन उत्पादन घेतले नाही. मात्र, अद्यापही चिकन पुरवठा सुरळीत झाला नाही.

कोरोनाआधीच्या काळाच्या तुलनेत मागणी ८५ टक्‍क्‍यापर्यंत आली आहे, तर उत्पादन मात्र ७० ते ७५ टक्‍क्‍यापर्यंतच आहे. परिणामी मागणी आणि पुरवठ्यात १० ते १५ टक्‍क्‍यांचे अंतर असून त्यामुळे चिकनच्या दरात वाढ झाली, अशी माहिती पोल्ट्री व्यावसायिक विराज साळुंखे यांनी दिली. कोरोनापूर्व काळात दरमहिना सरासरी दीड लाख कोंबड्यांची विक्री चिपळूण तालुक्‍यात होत होती. 

उपाहारगृहांकडून अपेक्षा

टाळेबंदी शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात राज्य सरकारने हॉटेल, उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपाहारगृहे सुरू झाल्यास चिकनची मागणी आणखी वाढणार आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास दरात वाढीची शक्‍यता आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com