esakal | रत्नागिरीतून एकमेव महिलेचा सहभाग ; ज्यांनी 'या' घटनेदरम्यान मूर्तीची केली पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

pramila vaidya share his memories about ram temple

लालकृष्ण अडवानींच्या भाषणातले एक वाक्‍य अजून आठवते...

रत्नागिरीतून एकमेव महिलेचा सहभाग ; ज्यांनी 'या' घटनेदरम्यान मूर्तीची केली पूजा

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : अयोध्या मंदिरासाठी १९९० आणि १९९२ मध्ये कारसेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळचे सारे संघर्षमय, भीतीदायक प्रसंग आजही नजरेसमोर आहेत. बाबरीचा ढाचा पडल्यावर तेथे मंदिरात रामलल्लाची सेवा केली. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होताना पाहूून डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले, अशी भावना कारसेविका श्रीमती प्रमिला पांडुरंग वैद्य यांनी व्यक्त केली. 

त्या म्हणाल्या, १९९० मध्ये पहिल्या कारसेवेत माणिकपूरपर्यंत पोचलो; पण पोलिसांनी सर्वांना तेथे उतरवले आणि तंबाखूच्या गोदामात ठेवले व दुसऱ्या इमारतीत महिलांना ठेवले. नंतर रत्नागिरीचा मुलगा आमच्याकडे आला व म्हणाला, डॉ. केतकर यांच्यासोबत आम्ही तिघे मिळेल त्या वाहनाने अयोध्येत जाणार आहोत. मी सोबत जायचे ठरवले.

हेही वाचा - त्यासाठी आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित माणसांची दुसरी फळी आवश्यक ; देवेंद्र फडणवीस...

शेते तुडवीत, तिथून रेल्वेने अलाहाबाद स्थानकाच्या अलीकडे पुन्हा शेतवडीत उतरलो. जवळच्या गावात कारसेवकांच्या छावण्या होत्या. हजारो कारसेवकांची व्यवस्था पाहून संयोजकांचे कौतुक व नवल वाटत होते. दुपारी मोर्चात सामील झाले, पण लाठीमार झाला. नंतर राष्ट्रसेविकाच्या महिलांनी रामजन्मभूमी आंदोलन, कारसेवा यावर भाषणे केली. १४४ कलम लागू असल्याने काशी गावात शांतता होती. 'मंदिर वही बनाएंगे' ही मोर्चाची घोषणा अपूर्ण राहिल्याने वाईट वाटले. नंतर काशीविश्‍वेश्‍वराचे दर्शन घेताना १६ सोमवार करीन, म्हणून नवस बोलले होते. 

१९९२ मध्ये पुन्हा कारसेवेची संधी आली. रत्नागिरीतून मी एकमेव महिला होते. कडाक्‍याची थंडी होती. रोज मोर्चे निघत. शिस्तीत घोषणा देत भजने म्हणत जात होतो. मैदानात मोर्चा आला की पुढाऱ्यांची भाषणे होत, असे त्यांनी सांगितले. दोन्ही कारसेवेत भाग घेण्यासाठी पती बाळासाहेब वैद्य यांनी परवानगी दिली. आज त्यांना भूमिपूजनाचा खूप आनंद झाला असता, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा - रत्नागिरीत अनुभव नसताना या दोन तरुणांनी खेचून आणले यश...

रामलल्लाची केली पूजा

लालकृष्ण अडवानींच्या भाषणातले एक वाक्‍य अजून आठवते... ‘उद्या सकाळी शरयूत स्नान करून मूठभर वाळू घेऊन या. तेथे ती वाळू राम मंदिराच्या बांधकामास उपयुक्त होणार आहे.’ दुसऱ्याच दिवशी मूठभर वाळू घेऊन निघालो. बाबरीच्या रस्त्यावर चारही मार्गाने लोक येत होते. एकदम रुग्णवाहिका धावू लागल्या. बाबरीचा ढाचा पडला, धुरळा उडाला. लोक नाचू लागले. तेथे छोटे मंदिर बांधून रामलल्लाची मूर्ती ठेवून पूजा केली.

संपादन - स्नेहल कदम 
 

loading image