Villagers from Konkan arrive in towns, markets bustling as Ganeshotsav preparations reach their final stage.Sakal
कोकण
Ganesh Chaturthi 2025: 'गावोगावी चैतन्य, कोकणवासीयांचे आगमन सुरू'; गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, बाजारपेठांत ग्राहकांची लगबग
Preparations for Ganeshotsav in Full Swing: नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणी असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे गावोगावी बंद घरांना नवसंजीवनी मिळाली असून वातावरण उल्हासमय झाले आहे.
-संदीप चव्हाण
म्हापण: कोकणातील सर्वात मोठा आणि आनंदाचा उत्सव असणारा गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. बुधवारी (ता.२७) घराघरात गणरायाचे आगमन होणार असून, नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणी असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे गावोगावी बंद घरांना नवसंजीवनी मिळाली असून वातावरण उल्हासमय झाले आहे.