Dr. Anil Patil : प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांची संशोधन व मान्यता समितीपदी नियुक्ती

मोखाडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
 Dr. Anil Patil
Dr. Anil Patilesakal

मोखाडा : मुंबई विद्यापीठातील  संशोधन करणाऱ्या संशोधकाच्या घोषवाऱ्यास मंजुरी देणारी समिती आहे. या समितीमध्ये मोखाड्यातील खोडाळा येथील मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील यांची मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ बळीराम गायकवाड यांनी नियुक्ती केली आहे. प्राचार्य डॉ अनिल पाटील यांच्या नियुक्तीमुळे मोहिते महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठात वजन वाढले असून मोखाडा तालुका आणि महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 Dr. Anil Patil
Accident News : जालंधर येथील अपघातात चिखलदरा तालुक्यातील चौघांचा मृत्यू

मुंबई विद्यापीठ मानवविद्या शाखेतील ग्रामीण विकास या अभ्यासक्रमात डॉ. अनिल पाटील यांचे भरीव योगदान आहे. त्यामुळे पीएचडीसाठी संशोधनाची पहिल्या टप्प्यातील पायरी असलेल्या रिसर्च ऍण्ड रिकग्नेशन कमिटीमध्ये त्यांची निवड झाली आहे. नवीन  संशोधकांची विद्यावाचस्पती (पी एच डी) करताना पहिल्या टप्प्यातील पायरीमध्ये चाळणी चाचणी घेतली जाते. त्या चाचणीतील समितीमध्ये प्राचार्य डॉ अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 Dr. Anil Patil
Jalgaon Banana News : केळीच्या बाजारभावात घसरण सुरूच; अनेक कारणांनी केळी उत्पादकांना बसतोय फटका

विद्यावाचस्पती ही शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत उच्च पदवी आहे. ही पदवी एखाद्या विशिष्ठ विषयावर संशोधनांतर प्रदान केली जाते. प्राध्यापक तसेच शास्त्रज्ञ होण्यासाठी ही पदवी उपयुक्त आहे. त्यांच्या निवडीने ग्रामीण आदिवासी भागातील संशोधकांना संशोधनाबाबत बारकावे, पाटील यांच्या माध्यमातून सोडविले जाणार आहे. संशोधन व मान्यता समिती महत्वाची समिती असल्याने सखोल आणि प्रगल्भ विषयज्ञान व सक्रिय सहभागाकरिता विषयतज्ञ म्हणून निवड झाली आहे.

 Dr. Anil Patil
Jalgaon Banana News : केळीच्या बाजारभावात घसरण सुरूच; अनेक कारणांनी केळी उत्पादकांना बसतोय फटका

प्राचार्य डॉ अनिल पाटील हे गेल्या पस्तीस वर्षांपासून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन काम करत आहेत. सेवेतील निवृत्तीनंतरही आदिवासी बांधवांसोबत असलेली नाळ कायम जोडून राहावी म्हणून त्यांनी मोहिते महाविद्यालयाच्या माध्यमातून आदिवासी भागात ज्ञानार्जन करण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. डॉ. पाटील यांचा पीएचडी करणाऱ्या संशोधकांना मार्गदर्शन करण्याचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांचे आतापर्यंत सहा विद्यार्थी संशोधकांना पीएचडी प्रदान झाली आहे.

त्यांच्या निवडीचे गिरीवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ चंद्रमणी मोहिते, सचिव प्रा. दीपक कडलग, उपप्राचार्य प्रा. यशवंत शिद, प्रा. तुकाराम रोकडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवर्तन काशीद, प्रा. रघुनाथ मोरे आदींनी कौतुक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com