
Prof. Dr. Shrikrishna Tupare honored with Best Teacher Award at the hands of Union Minister Kiren Rijiju.
Sakal
-अमित गवळे
पाली: नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रभारी विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षासाठी ग्रामीण महाविद्यालय विभागात दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सोमवारी (ता. 15) केंद्रिय अल्पसंख्याक व संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ.अजय भामरे, कुलसचिव डॉ. विलास कानाडे सह अन्य मान्यवर उपस्थित होते.