Electricity Company : 'महावितरण'चा 21 नवीन उपकेंद्रांचा प्रस्ताव; 100 मीटरचं अंतर होणार कमी, 63 कोटींचा अपेक्षित खर्च

समस्यांवर तोडगा काढण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे.
Maharashtra State Electricity Distribution Company
Maharashtra State Electricity Distribution Companyesakal
Summary

नवीन उपकेंद्रामुळे कोट्यवधीचा महसूल देणाऱ्या घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक ग्राहकांची विनाव्यत्यय वीज वितरण करणे शक्य होणार आहे.

रत्नागिरी : महावितरण कंपनीने (Maharashtra State Electricity Distribution Company) वीजवितरणचे जाळे अधिक मजबूत आणि ग्राहकांना चांगल्या दाबाने विद्युत पुरवठा होण्यासाठी २१ नवीन उपकेंद्रांचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाला पाठवला आहे. सुमारे ६३ कोटींचा हा प्रकल्प आहे.

उपकेंद्रांमधील अंतर सुमारे १०० मीटरचे असल्याने विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यात अनेक अडथळे येतात. त्यामधील अंतर कमी झाल्यास परिसरातील वीज ग्राहकांना योग्य दाबाने विनाव्यत्यय वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.

Maharashtra State Electricity Distribution Company
Loksabha Election : 'भाजप-धजद युतीची अद्याप वेळ आली नाही'; कुमारस्वामींच्या वक्तव्याने खळबळ, BJP बॅकफूटवर?

नवीन उपकेंद्रामुळे कोट्यवधीचा महसूल देणाऱ्या घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक ग्राहकांची विनाव्यत्यय वीज वितरण करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात महावितरण कंपनीची ५५ उपकेंद्र आणि १९५ फिडर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून ५ लाख ९९ हजार ग्राहकांना विद्युत पुरवठा केला जातो.

परंतु, जिल्ह्याची भौगोलिक परिस्थितीमुळे आणि दरीखोऱ्यातील, चढ-उताऱ्यामुळे उपकेंद्रातील अंतर १०० मीटरच्या दरम्यान आहे. या अंतरामुळे एका उपकेंद्रावरील त्या परिसरातील ग्राहकाचा अतिरिक्त लोड येतो. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होते, कमी दाबाने विद्युत पुरवठा होणे, अशा अनेक अडचणी निर्माण होतात. महावितरण कंपनीच्या लाईमनचेही काम वाढते.

Maharashtra State Electricity Distribution Company
Sulkud Water Scheme : 'आता नाही तर कधीच नाही'; सुळकूडप्रश्‍‍नी इचलकरंजीकर रस्त्यावर, मानवी साखळीतून पुन्हा एल्गार

गेल्या काही वर्षांपासूनच्या जिल्ह्यातील या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यात आणखी २१ उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव कंपनीने तयार केला आहे. १०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असलेल्या भागात ही उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.

Maharashtra State Electricity Distribution Company
'आभासी प्रेम' ठरतंय आत्महत्येचं कारण; खेड्यातली मुलं अडकली जाळ्यात, नैराश्‍यातून उचललं जातंय टोकाचं पाऊल

त्यामुळे अंतर कमी होऊन ग्राहकांची संख्या मर्यादित राहिली. त्यांना योग्य दाब आणि विनाखंडित सेवा देता येईल, हा कंपनीचा उद्देश आहे. एक उपकेंद्र उभारण्यासाठी सुमारे ३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यात २१ उपकेंद्र उभारण्यात येणार असल्याने या प्रकल्पाचा खर्च ६३ कोटी आहे. तसा प्रस्ताव महावितरण कंपनीने तयार केला असून, तो मुख्य कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील उपकेंद्रांमधील अंतर जास्त आहे. हे अंतर कमी केल्यास ग्राहकांना अखंडित आणि चांगल्या दाबाने विद्युत पुरवठा करणे सोपे होणार आहे. ग्राहकांना उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने नवीन २१ उपकेंद्रांचा प्रस्ताव तयार केला आहे.

-एस. एस. काटकर, अधीक्षक अभियंता महावितरण

Maharashtra State Electricity Distribution Company
'आभासी प्रेम' ठरतंय आत्महत्येचं कारण; खेड्यातली मुलं अडकली जाळ्यात, नैराश्‍यातून उचललं जातंय टोकाचं पाऊल

रत्नागिरी जिल्हा ग्राहक संख्या (ऑगस्ट २०२३)

विभाग संख्या

  • घरगुती ५ लक्ष २३ हजार

  • वाणिज्य ३७ हजार ६९७

  • औद्योगिक ५ हजार ६४३

  • कृषी १९ हजार ९३०

  • पथदिवे २ हजार २३

  • सार्वजनिक पाणीपुरवठा २ हजार ९४९

  • सार्वजनिक सेवा शासकीय ३ हजार २९०

  • सार्वजनिक सेवा इतर २ हजार ९९६

-इतर १ हजार ४६०

-एकूण ५ लाख ९९ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com