सुधागडमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; 14 जणांना अटक

अमित गवळे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पाली (रायगड): सुधागड तालुक्यातील उन्हेरे (बुद्रुक) येथील अपर्णा फार्म हाऊसमध्ये विनापरवाना सार्वजनिकरित्या चालविल्या जाणार्‍या जुगार अड्ड्यावर सोमवारी (ता. 23) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग यांनी धाड टाकली.

या धाडीत एकूण 76 हजार 910 रुपये किमतीचा माल जप्त केला. याबरोबरच जुगार खेळण्याकरीता वापरण्यात आलेले टेबल, खुर्च्या, पत्ते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पाली पोलिस स्थानकांत 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

उन्हेरे येथील अपर्णा फार्महाऊसवर पत्त्याच्या खेळावर आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने पैसे स्विकारुन या जागेचा जुगार खेळण्याकरीता सर्रासपणे वापर केला जात होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलिस निरिक्षक वनकोटी (अलिबाग) यांच्या नेतृत्वाखाली पथकाने येथे धाड टाकली. या धाडसत्रात एकूण 14 जणांविरोधात जुगारबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आल आहे. पुढील तपास पाली पोलिस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. जी. गिरी हे करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: raigad news sudhagad 14 arrested