

Gomay Ganesh Idol
esakal
राजापूर : गणेशोत्सवातील श्रद्धा आणि भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड देत गोमय गणेशमूर्तींचा पर्याय पुढे येत आहे. देशी गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असून, पीओपीला पर्याय म्हणून त्यांचा प्रचार केला जात आहे. कोकणचे सुपुत्र पंचगव्य चिकित्सक सुहास पंडित आणि योगेश आंब्रे गेल्या दशकभरापासून प्रशिक्षण, प्रचार आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून गोमय गणेशमूर्तीची संकल्पना समाजमनात रुजविण्याचे काम करत आहेत.