konkan
konkanesakal

शिवसेनेच्या माजी आमदाराच्या मुलाचा राजकीय बळी जाणार?

योगेश यांच्याकडे संघर्ष आणि स्वःकीयांच्या विरोधी कारवाया यांचा वारसा आला आहे.

चिपळूण : माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचा युवासेनेच्या माध्यातून राजकारणात सहज प्रवेश झाला. नंतर ते आमदार झाले; मात्र आमदार होण्यासाठी त्यांना विरोधी पक्षाबरोबर अंतर्गत संघर्ष करावा लागला. सध्याचे चित्र पाहता शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे भविष्यातील त्यांची राजकीय वाटचालही संघर्षमय असेल, असे दिसते. माजी मंत्री रामदास कदम यांना राजकारणात शह देण्यासाठी आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांचा बळी देण्याची खेळी खेळली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे योगेश यांच्याकडे संघर्ष आणि स्वःकीयांच्या विरोधी कारवाया यांचा वारसा आला आहे.

शिवसेने नेते रामदास कदम १९९० पासून २००४ पर्यंत आमदार होते. युती सरकारमध्ये त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी संभाळली. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून रामदास कदम यांची ओळख निर्माण झाल्यानंतर शिवसेनेतील त्यांचे अंतर्गत शत्रू वाढले.

konkan
पुणे, नाशिकसह 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा तडाखा, गारपीटीचा अंदाज

२००९ मध्ये ते दापोली मतदार संघात उभे राहिले असते तर सहज निवडून आले असते, पण त्यांना गुहागर मतदार संघातून उभे राहण्याची सूचना करण्यात आली आणि अनपेक्षितपणे त्यांचा पराभव झाला; मात्र रामदास कदमांच्या छत्रछायेखाली तयार झालेले संजय कदम राष्ट्रवादीच्या तिकिटावर दापोली मतदार संघाचे आमदार झाले. नंतर रामदास कदम मुंबई मतदार संघातून विधान परिषदेवर गेले. २०१४ च्या युती सरकारमध्ये पर्यावरण खात्याचे मंत्री झाले. मुंबईतून राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा हस्तक्षेप होणार नाही, याची खबरदारी शिवसेनेतील काहीजण घेत होते. तेव्हा मुलगा योगेश कदम याचे राजकीय करिअर घडवण्यासाठी ते दापोली मतदार संघात बांधणी करत होते.

शिवसेनेचा प्रमुख भाग असलेल्या युवासेनेच्या कोअर कमिटीवर काम करत असताना योगेश कदम यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा विश्वास संपादन केला होते. २०१९ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर योगेश कदम यांना शिवसेनेतूनच छुपा विरोध सुरू झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांना शिवसेनेने घेऊन योगेश कदम यांचा पत्ता कट करण्यासाठी कदम विरोधकांची फळी मातोश्रीवर सक्रिय झाली. तेव्हा रामदास कदम यांनी आपली आमदारकी आणि मंत्रिपद पणाला लावून योगेशसाठी उमेदवारी मिळवली.

konkan
Russia-Ukraine War Live: कोकाकोलाने रशियाविरोधात घेतली भूमिका; थांबवला व्यवसाय

योगेश कदमला निवडून आणले. या सर्व घडामोडींच्या पाठीमागे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा हात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते; मात्र भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पालकमंत्री अनिल परब यांच्याविरोधी रसद पुरवल्याचा आरोप रामदास कदमांवर झाला. नंतर दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून निवडणुकीचे सूत्र माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देत कदम पिता-पुत्रांना डावलण्यात आले.

प्रस्थ वाढणार नाही, याची खबरदारी

आमदार म्हणून योगेश कदम यांचे प्रस्थ वाढणार नाही, याची खबरदारी शिवसेनेत घेतली जात आहे. २०२४ च्या निवडणुकीत योगेश कदमांऐवजी संजय कदम यांना पक्षात घेऊन उमेदवारी देऊन योगेश कदम यांचे राजकीय करिअर संपवण्यासाठी शिवसेनेत प्रयत्न सुरू आहेत.

संघर्षाच्या काळातही संयम

दापोली मतदार संघात रामदास कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या मुलाचे राजकीय करिअर संपवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले तरी रामदास कदम आणि आमदार योगेश कदम सहजासहजी हार मानणार नाहीत. कारण योगेश कदम यांची आमदार म्हणून अल्प कालावधीतील कामगिरी उजवी आहे. विधानसभेतील त्यांच्या भाषणात सामान्य लोकांबद्दल असणारी तळमळ, मतदार संघातील लोकांशी असलेला जनसंपर्क, निधीचा योग्य विनियोग करून त्याची राजकीय वाटचाल सुरू आहे. संघर्षाच्या काळातही त्यांनी संयम सोडलेला नाही.

konkan
MPSC: ‘पीएसआय’ची गुणवत्ता यादी जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com