जागतिक पर्यटन दिन ; गरज पर्यटन संस्कृती निर्माणाची

जागतिक पर्यटन दिन ; गरज पर्यटन संस्कृती निर्माणाची
ratndurg
ratndurgsakal

रत्नागिरी : नितांतसुंदर समुद्रकिनारे, रमणीय पुरातन देवळे, ऐतिहासिक किल्ले, तसेच निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली असतानाही पर्यटन विकासाला दिशा व प्रभावी मार्केटिंग नसल्याने अपेक्षित गती प्राप्त झाली नाही. २० जाने. १९७५ रोजी 'पर्यटन विकास महामंडळ' स्थापन झाले. परंतु इतर सरकारी मंडळाप्रमाणेच भरकटत गेले. नव्या कल्पना, खासगी क्षेत्राला वाव व पूर्ण व्यावसायिक दृष्टीने मंडळाकडे न पाहिल्याने मंडळाला कोणीच गांभीर्याने घेतले नाही. आपल्याकडे पर्यटन संस्कृती निर्माण झाली नाही, ती होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यटन दिनानिमित्ताने लेखकाने अधोरेखित केली आहे

- ॲड. विलास पाटणे

१९८० दशकात गणपतीपुळे, महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणी पर्यटक रिसॉर्टस उभारण्यात आली. शिर्डी दर्शन, अंजठा वेरुळ अशा सहलीही मंडळातर्फे आयोजित केल्या गेल्या. परंतु डेक्कन ओडीसी लक्झरी ट्रेन अल्पावधीत बंद पडली. २६ ऑगस्ट १९९७ ला सिंधुदुर्ग पहिला पर्यटन जिल्हा घोषित करणेत आला. नंतर नागपूर, औरंगाबाद हे पर्यटन जिल्हे तर २०१८ मध्ये जुन्नर तालुक्यात विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा जाहीर झाला. या सर्व घोषणा व पाट्या लागल्या. परंतु पर्यटन विकास कागदावरच राहिला.

याउलट भाट्ये, जयगड, सावित्री, वशिष्टी, जैतापूर, पडेल, देवबाग, तारकर्ली, तेरखोल आदी कोकणातील नद्या - खाड्यांमध्ये भुरळ घालणारे नैसर्गिक सौंदर्य असूनही, बॅक वॉटर संकल्पना आपण राबवू शकलो नाही. तरुणांना हाऊसबोटीकरीता अर्थसहाय्य, छोट्या जेट्टी व प्रभावी मार्केटींग केले तर तरुणांना रोजगार आणि अर्थव्यवस्थेस भक्कम आधार मिळेल. मालवण जवळील भोगवे (वेंगुर्ला) समुद्र किना-याला ब्ल्यूफ्लॅग मानांकनामुळे प्राप्त झालेला आंतरराष्ट्रीय दर्जा आपण एनकॅश केला नाही.

जागतिक हेरिटेज दर्जा असलेली देशात ३९ तर महाराष्ट्रात ५ स्थळे आहेत. परंतु पर्यटन क्षेत्रात १४० देशात भारताचा क्रमांक ३८ वा लागतो. २०१९ मध्ये ८९.४ मिली परदेशी पर्यटक फ्रान्सने आकृष्ट केल्याने प्रथम क्रमांकावर आहे. तर भारतात जेमतेम १ कोटी ९३ लाख परदेशी पर्यटक आले. २०२० मध्ये हा आकडा घसरुन २० लाख ७४ हजारावर गेला तर यावर्षीच्या जुलैपर्यंत तो ४२ हजारपर्यंत खाली आला. कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात आल्याने लाखो लोकांचा रोजगार बुडाला आहे.

ratndurg
जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवली जाणार

कोकणातील गौरी-गणपती, होळी याचे दर्शन पर्यटकांना करुन देण्यात कोणती अडचण आहे? खेळे, नमन दशावतारी आणि कोकणातील खास पदार्थ उकडीचे मोदक, सोलकढी, मासे, आंबा-फणस, काजू सारखी फळे, जाई-जुई - बकुळी, आबोली या सर्वात पर्यटकांना आनंद भरभरुन देण्याची क्षमता आहे. कोकणचा सांस्कृतिक वारसा छोट्या मोठ्या कार्यक्रमातून पर्यटकांना रुचेल, आवडेल असा प्रयत्न झाला पाहिजे.

कायद्यातील नव्या बदलानुसार सीआरझेड ३ भागात ग्रामीण भागात रिसॉर्ट व हॉटेलकरीता स्वच्छतागृह यासाठी झावळ्यांची तात्पुरत्या स्वरुपात सोयी करणेकरीता परवानगी मिळाली आहे. ५० मीटर क्षेत्रांना विकास क्षेत्र म्हणून मान्यता मिळाल्याने मनोरंजन प्रकल्प व साहसी खेळांना वाव मिळून पर्यटन विकासाला नव्याने संधी मिळेल. गणपतीपुळ्यात जलपर्यटनाची सुरवात होते आहे. बोट क्लबच्या माध्यमातून पॅरासेलींग, सर्फर बोर्ड, बनामा स्पोर्ट्स आदी साहसी खेळांना सुरवात होते आहे, याच स्वागत आहे. परंतु ड्रीम प्रोजेक्ट सी वर्ल्ड प्रकल्पाच पुढे काय झाल, कळावयास मार्ग नाही.

पर्यटन ही सर्वसमावेशक संकल्पना असून विकासाकरीता सर्व संबंधितांनी प्रयत्न केले पाहिजेत. बोटीवरील खलाशी, शहाळी विकणारा, संगिताचे ज्ञान असणारा, हातमागावरील वस्तू विक्रेता, गाईड या सर्वांना पर्यटन व्यवसायात संधी आहे. खरेतर पर्यटन ही संस्कृती आहे. जगात जेथे-जेथे पर्यटन विकास झाला तेथे पर्यटन संस्कृती जोपासली गेली आहे.

ब्रँडींग व मार्केटींगवर लक्ष द्यावे

शिवछत्रपतींची राजधानी रायगड, स्वराज्याच्या संघर्षात अफझलखान मारला गेलेला प्रतापगड, सिंधुदुर्ग, जंजिरा आदी किल्ले योग्य जतन केले तर पर्यटकांना आनंद मिळेल. हैद्राबादच्या गोवळकोंडा किल्ल्याला फारसे ऐतिहासिक महत्त्व नसताना अप्रतिम लाईट - साऊंड शोच्या माध्यमातून हजारो पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटन विभागाने पर्यटकांना कुतुहल व आकर्षण वाटते अशाच प्रामुख्याने ब्रँडींग व मार्केटींग करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com