कोकण - २ जिल्ह्यातील नगरपंचायतीसाठी आज मतदान, मतमोजणी उद्या

दापोली नगरपंचायतीच्या ४ प्रभागांसाठी ही निवडणूक होत असून या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.
voting
votingsakal

दाभोळ : दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक(dapoli nagarpanchyaat election) २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी (ता. १८) होत असून या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ४ प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. आर.आर. वैद्य इंग्लिश मिडीअम स्कूल येथील मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र (Sensitive polling stations)म्हणून घोषित करण्यात आल्याने तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

voting
Opinion Poll: यूपीत भाजप तर पंजाबमध्ये आप? पाच राज्यात कसं असेल चित्र?

दापोली नगरपंचायतीच्या ४ प्रभागांसाठी ही निवडणूक होत असून या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ (अहमदनगर) या प्रभागातून ३ उमेदवारांमध्ये लढत होणार असून यात साधना धाडवे (भाजप), संचिता जोशी (अपक्ष, शिवसेवा विकास आघाडी) , नौशीन गिलगिले (शिवसेना). प्रभाग क्रमांक ६ (पोस्टआळी) मध्ये ४ उमेदवार रिंगणात आहेत त्यात वेदा गोरे (भाजप), श्वेता दुर्गावळे (अपक्ष, शिवसेवा विकास आघाडी), सारिका देसाई (मनसे), साधना बोथरे (राष्ट्रवादी), प्रभाग क्रमांक ८ (फँमिली माळ ०६) या प्रभागात ६ उमेदवार रिंगणात आहेत त्यात दिलीप भैरमकर (अपक्ष),रवींद्र क्षीरसागर (शिवसेना), प्रसाद मेहता (कॉग्रेस), अरविंद पुसाळकर (मनसे), ऋषीकेश हेदुकर (भाजप), प्रशांत पुसाळकर (अपक्ष, शिवविकास आघाडी) यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ९ (फँमिली माळ ०७) या प्रभागातून जावेद सारंग (अपक्ष), अझीम चिपळूणकर (शिवसेना), जितेंद्र महाडीक (भाजप), किरण घोरपडे (अपक्ष) हे ४ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

या निवडणुकीसाठी ५ मतदान केंद्र असून त्यात अहमदनगर प्रभागासाठी जिल्हा परिषद शाळा गाडीतळ, पोस्टआळी प्रभागासाठी गोखले कन्याशाळा, फँमिली माळ प्रभाग क्रमांक ८ व ९ साठी आर.आर. वैद्य इंग्लिश मीडिअम स्कूल येथे मतदान केंद्र असणार आहेत. मतदान केंद्रावर ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.

voting
Opinion poll : पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत का? मांडा तुमचं मत

देवगडात आज मतदान

नगरपंचायत निवडणूक; प्रशासन सज्ज, २८०० जण बजावणार हक्क

देवगड येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उर्वरित चार प्रभागांमधील निवडणुकीसाठी उद्या (ता.१८) मतदान होणार आहे. चार जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. चार प्रभागांत मिळून एकूण २ हजार ८०० मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एकूण चार मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

यावेळी अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरूद्ध काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडी अशी रणनीती आहे. पहिल्या टप्प्यात १३ प्रभागांसाठीची निवडणूक झाली. तर आता उर्वरित चार प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. प्रभाग ४ मध्ये (जामसंडे हनुमाननगर, शांतीनगर, वळकूवाडी) ३५८ महिला आणि ३७१ पुरुष मिळून एकूण ७२९ मतदार आहेत. या प्रभागासाठी जामसंडे येथील श्रीराम मोरेश्‍वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर येथे मतदान केंद्र आहे. प्रभाग ५ मध्ये (जामसंडे बौद्धवाडी, जामसंडे टापू) २६५ महिला आणि २५७ पुरूष मिळून एकूण ५२२ मतदार आहेत.

या प्रभागासाठी जामसंडे येथील आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर येथे मतदान केंद्र आहे. प्रभाग ७ मध्ये (जामसंडे मळईवाडी, तुळशीकाटा, सहकारनगर) ४२३ महिला आणि ४१८ पुरूष मिळून एकूण ८४१ मतदार आहेत. या प्रभागासाठी येथील स. ह. केळकर महाविद्यालयात मतदान केंद्र आहे. तर प्रभाग ८ मध्ये (देवगड आनंदवाडी भाग १, देवगड मुणगेकरनगरी, नलावडे कॉम्लेक्स्, तुळशीनगर) ३६३ महिला आणि ३४५ पुरूष मिळून एकूण ७०८ मतदार आहेत. या प्रभागासाठी येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे मतदान केंद्र आहे. चारही प्रभागांत मिळून १४०९ महिला आणि १३९१ पुरूष मिळून एकूण २ हजार ८०० मतदार आहेत. मतदानाच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. संबधित मतदान केंद्रांत मतदान यंत्रे रवाना करण्यात आली आहेत.

कुडाळात कडक पोलिस बंदोबस्त

कुडाळ - येथील नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी उद्या (ता.१८) मतदान होणार असून १९ ला मतमोजणी होईल. यासाठी कुडाळ पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त कडक करण्यात येईल, अशी माहिती येथील पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली. मतदान आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस प्रशासनाने आजपासूनच कुडाळ शहरात महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविला असून काही संशयास्पद आढळल्यास कसून चौकशी करण्यात येईल, असेही श्री. मेंगडे यांनी स्पष्ट केले.

voting
नाशिक : चार्जिंग स्टेशनसाठी ‘रिलायन्स’, मात्र मनपाला हवाय ‘टाटा’

मतमोजणी उद्या

नगरपंचायतीच्या सर्व १७ प्रभागांची बुधवारी (ता.१९) येथील तहसील कार्यालयात मतमोजणी (couting of votes )होणार आहे. पहिल्या फेरीत चार प्रभाग अशा १७ प्रभागांच्या एकूण पाच फेऱ्यांमधून निकाल घोषित होतील, अशी माहिती निवडणूक विभागाकडून() देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com